कोरोनामुळे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू  

कोरोनामुळे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू  


मुंबई: मुंबईनंतर पुणे, नाशिक आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू झाला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात १००७ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १०६ पोलीस अधिकारी व ९०१ कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. त्यात एकट्या मुंबईतील ३९४ पोलिसांचा समावेश आहे.करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुंबईसह राज्यभरातील पोलीस आपल्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र पहारा देत आहेत. ही सेवा बजावताना अनेक पोलिसांना करोनाने गाठले असून आतापर्यंत मुंबईत ५ तर राज्यात एकूण ८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 

 मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचा करोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईतील ५ तर राज्यातील एकूण ८ पोलिसांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या महिन्यापासून मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षांवरील पोलिसांना रजेवर पाठवण्यात आले आहे. शिवाय जे पोलीस आजारी आहेत अशा पोलिसांनाही रजा घेण्यास सांगण्यात आले आहे.

मुरलीधर वाघमारे यांच्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दल शोकाकुल झालं आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी वाघमारे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देतानाच महासंचालक तसेच विविध श्रेणींमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यासोबतच वाघमारे कुटुंबाप्रतीही सहवेदना व्यक्त करण्यात आली आहे.


WebTittle :: Corona kills Mumbai police officer


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com