आरोग्याचे नियम पाळा, अन्यथा थंडीत कोरोनाचा हाहा:कार! पुढील 3 महिने अत्यंत महत्वाचे

साम टीव्ही
बुधवार, 30 सप्टेंबर 2020
  • थंडीमध्ये वाढणार करोनाचा कहर ?
  • पुढील 3 महिने अतिशय महत्वाचे
  • आरोग्याचे नियम पाळा, अन्यथा हाहा:कार 

आठ महिने उलटले तरीही कोरोनाचा कहर सुरूच आहे. अशातच आता हिवाळा सुरू होतोय. हिवाळ्यात कोरोना रूग्णांची संख्या आणखी वाढेल अशी भीती व्यक्त होतीय. 

देशात करोनाचा शिरकाव होऊन आठ महिने झालेत. मात्र अद्यापही कोरोनाचं संक्रमण रोखण्यात यश मिळालेलं नाही. अशातच बदलतं वातावरण ही देखील एक चिंतेची बाब बनलीय. लवकरच हिवाळा सुरू होईल आणि हिवाळ्यात कोरोनाचा कहर वाढेल अशी भीती व्यक्त होतीय. सध्या जगभरात कोरोनाची दुसरी लाट आलीय अशात पुढील तीन महिने अतिशय महत्वाचे असणार आहेत. 

हिवाळ्यात कोरोनाचा कहर 

हिवाळा हा विषाणूंच्या प्रजननाचा आणि संसर्गाचा काळ असतो. हिवाळ्यात श्वसनमार्गात होणाऱ्या संसर्गात वाढ होते, त्यामुळे या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. 

सध्याच्या घडीला देशातील रूग्णसंख्या 61 लाख 45 हजार 291 इतकी आहे. यातील 51 लाख 1 हजार 397 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 9 लाख 47 हजार 567 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 10  वर्षांपुढील 15 पैकी 1 व्यक्ती करोनाबाधित आहेत. 

खरं तर लॉकडाऊन शिथील होताच लोक मोकाट सुटले आहेत. बाजारपेठा, बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. सर्रासपणे नियम पायदळी तुडवले जातायेत. याबाबत गांभीर्यानं विचार व्हायला हवा, पुढील तीन महिने अत्यंत महत्वाचे आहेत याची जाणीव प्रत्येकानं ठेवायला हवी. अन्यथा हिवाळ्यात कोरोना रूग्णांचे आकडे दुपटी तिपटीनं असतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live