औरंगाबाद शहरापेक्षा ग्रामीणमध्ये कोरोनाचा विळखा..(पहा व्हिडिओ)

Corona
Corona

औरंगाबाद : कोरोनाच्या Corona पहिल्या लाटेत शहरातून City लोक आपल्या गावाला  rural  गेले होते. पण आता ही परिस्थिती बदली आहे. गावा-गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सुद्धा वाढत आहेत. त्यामुळे शहरातून गावाला जाताना गाव सील Seal तर झालं नाही ना, याची खात्री करण अत्यंत महत्वाचे आहे. Corona is more  Increased in rural areas than Aurangabad

शहरापेक्षा गावामध्ये कोरोना वाढत आहे. यामुळे गावी निघाल्याची पंचाईत झाली आहे. गड्या आपलं गावच बरा म्हणाऱ्यांची कोंडी झाली आहे. कोरोना वाढल्याने शहरातील शेकडो लोकांनी गेल्या वर्षी आपापल्या गावाकडे धाव घेतली आहे. पणआता गावही कोरोना पासून सुरक्षित राहिले नाहीत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्याचे विचार केले असता, शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

१६ एप्रिलला शहरात ६३८ रुग्ण तर ग्रामीण भागात ७५० रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्याचप्रमाणे १७ एप्रिलला शहरात ६१८ तर ग्रामीण भागात ९८२ रुग्ण आणि १८ एप्रिलला ६५६ रुग्ण शहरात तर ७७३ रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत. यात चिंतेची बाब म्हणजे ग्रामीण भागात मृत्यूवांची संख्या सुद्धा जास्त प्रमाणात आहे. Corona is more  Increased in rural areas than Aurangabad

ग्रामीण भागात पसरण्याचे कारण म्हणजे लोकांचा शहराशी असलेला संपर्क, बाजारासाठी केलेला संचार, मास्क Mask न वापरणे, मोटार- सायकल वर तिघा तिघांनी बसणे या अशा प्रकारांवर निर्बंध आणले पाहिजेत. गावामध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शहरात कोरोना वाढल्याने गावाकडे जाणाऱ्यांनी गावात किती कोरोनाचे रुग्ण आहेत याची खात्री करा आणि मगच गावाची वाट धरावी. 

Edited By- Digambar Jadhav    

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com