धक्कादायक! पॉझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट देत ठेवलं कोविड सेंटरमध्ये...

अभिजित घोरमारे
सोमवार, 19 एप्रिल 2021

देवरी येथे कोरोना निगेटीव्ह व्यक्तीला कोरोना रिपोर्ट न देताच पाँझिटिव्ह दाखवून त्या निगेटिव्ह व्यक्तीला कोवीड सेंटरमध्ये नेल्याचा  खळबळजनक प्रकार समोर आला आहे

गोंदिया - कोरोनाचा Corona उद्रेक होत असतानाच जिल्ह्यातील देवरी Devri येथे कोरोना निगेटीव्ह Negative व्यक्तीला कोरोना रिपोर्ट न देताच पाँझिटिव्ह Positive दाखवून त्या निगेटिव्ह व्यक्तीला कोवीड Covid सेंटरमध्ये नेल्याचा  खळबळजनक प्रकार समोर आला आहे.Corona Negative Person Shown Positive in Gondia

डाॅक्टरांनी यावरच न थांबता निगेटिव्ह रूग्णावर गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली आणि त्याची रवानगी कोवीड सेंटरमध्ये  करून त्याच्यावर दोन दिवस कोवीड विषयक उपचार करून निगेटिव्ह असल्याचे सांगून त्याला सुट्टी दिली आहे. 

यामुळे कोरोना निगेटिव्ह असलेल्या व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.या प्रकरणी त्या व्यक्तीने डाॅक्टरच्या विरोधात देवरी पोलिसांत Police ठाण्यात  तक्रार नोंदवली आहे. कोरोना संसर्गकाळात Infection अशाप्रकारची डाॅक्टरांविरोधात पहिलीच तक्रार दाखल करण्याची घटना असावी.

Edited By- Digambar Jadhav

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live