Special Report | Mumbai | कोरोना दारात, मास्क नाही घरात

सुमीत सावंत
बुधवार, 4 मार्च 2020

कोरोना दारात आणि मास्क नाही घरात, अशी मुंबईकरांची अवस्था झाली आहेे. कोरोनापासून बचावासाठी N95 मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातोय. मात्र प्रत्यक्षात मुंबईत हे मास्क उरलेच नाही आहेत.

मुंबई - कोरोना भारतात पोहोचला आणि या बातमीने मुंबईकरांचे धाबे दणाणले आहे. भयभीत झालेले मुंबईकर मेडिकल दुकानात पोहोचले. मात्र कोरोना पासून रक्षण करण्यासाठी त्यांना मास्क काही मिळाले नाहीत.

 

हेही वाचा - होळीच्या सणावर कोरोनाचं सावट

पाहा व्हिडीओ - #VIRALSATYA | दाढीमुळे तुम्हाला कोरोना व्हायरसचा धोका?

मुंबईहून चीनला जाणाऱ्या बऱ्याच व्यापाऱ्यांनी मुंबईतून N95 मास्कची खरेदी केली. आणि ते चीनला नेले. त्यामुळे मुंबईकर कोरोना वेशीवर उभा असताना, मास्कसाठी वणवण भटकतायत.

corona no mask in mumbai medical china maharashra health serious


संबंधित बातम्या

Saam TV Live