'कोरोनावर उष्णतेचाही परिणाम होत नाही, कडक उन्हातही कोरोना धरतो तग'

सागर आव्हाड
सोमवार, 25 मे 2020
  • कोरोनावर तापमानाचाही होत नाही परिणाम 
  • कडक उन्हातही कोरोना धरतो तग 
  • अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांचं महत्त्वपूर्ण संशोधन 

उष्ण तापमानातही कोरोना व्हायरस तग धरू शकतो, असं एका संशोधनातून निष्पन्न झालंय.भारतात सध्या तापमान चांगलंच वाढू लागलंय. भारतातल्या कडक उन्हाळ्यात कोरोनाचा फैलाव फारसा होणार नाही, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. कारण, उष्ण तापमानातही कोरोना व्हायरस तग धरू शकतो, असं एका संशोधनातून समोर आलंय.

कोरोनाचा चीनमधून जगभरात फैलाव झाला. त्यावेळी कोरोना व्हायरस उष्ण तापमानात तग धरणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, ब्राझील, इक्वेडोर आणि ऑस्ट्रेलियातल्या अंगाची लाही लाही करणाऱ्या तापमानातही कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं झाला. त्यामुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय. कोरोनावर तापमानाचा काय परिणाम होतो, यावर अमेरिकेच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. सायन्स नावाच्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. 
संशोधकांच्या मते, वाढत्या तापमानाचा कोरोना व्हायरसवर कोणताही परिणाम होत नाही. लसीविना या महामारीवर नियंत्रण मिळवणं अशक्य आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच लस विकसित झाली नाही, तर या विषाणूमध्ये वातावरणानुसार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोना व्हायरस कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही तापमानात पसरू शकतो, हे जागतिक आरोग्य संघटनेनंही स्पष्ट केलंय. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी खबरदारी हाच एकमेव पर्याय सध्या तरी आपल्या हाती आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live