शताब्दी रुग्णालयातून कोरोना रुग्ण बेपत्ता होतो आणि काही तासांत त्याचा मृतदेह मिळतो. काय घडलं नेमकं?

साम टीव्ही
मंगळवार, 9 जून 2020

 

  • शताब्दी रुग्णालयातून कोरोना रुग्ण बेपत्ता
  • बेपत्ता रुग्णाचा मृतदेह स्टेशनवर सापडला
  • मुंबईच्या रुग्णालयांमध्ये चाललंय तरी काय?

मुंबईत एक धक्कादायक घटना घडलीय. शताब्दी रुग्णालातनं एक कोरोनाबाधित गायब होतो आणि काही तासात बोरिवली स्टेशनवर त्याचा मृतदेह मिळतो. काय घडलं नेमकं ?

मुंबईला हादरवून टाकणारी एक घटना समोर आलीय. मुंबई मनपाच्या शताब्दी रुग्णालयातून 8 जूनच्या पहाटे कोरोनाग्रस्त 80 वर्षीय वृद्ध बेपत्ता झाले. 9 जूनला बोरिवली स्टेशनवर त्यांचा मृतदेह आढळला. 
दरम्यान रुग्णालयाच्या निष्काळीपणामुळे 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.

मुळात आजोबा रुग्णालयाबाहेर गेलेच कसे याचा शोध सीसीटीव्हीच्या आधारे घेतला जातोय. दुसरीकडे मनपा प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिलेत. 

याआधीही शताब्दी रुग्णालयात अनेक हलगर्जीपणाच्या घटना समोर आल्यात. आता या प्रकारामुळे तर मुंबईच्या रुग्णालयांमध्ये रुग्णही सुरक्षित नाही का असं विचारायची वेळ आलीय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live