दिलासादायक! कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला...वाचा काय आहे सध्याची परिस्थिती

साम टीव्ही
गुरुवार, 4 जून 2020

आता राज्यासाठी एक चांगली बातमी आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काही प्रमाणात मंदावलाय. कोरोना रुग्णवाढीचा दर हा 7 टक्के होता.

आता राज्यासाठी एक चांगली बातमी आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काही प्रमाणात मंदावलाय. कोरोना रुग्णवाढीचा दर हा 7 टक्के होता.

मात्र गेल्या 7 दिवसात राज्याचा सीडीजीआर म्हणजे रुग्णवाढीचा दर हा 4.15 टक्के इतका आहे. रूग्णसंख्या दुप्पट होण्याची आकडेवारीही 17.35 दिवसांवर आली आहे. कोरोनाचा प्रसार थांबला नसला तरी हा प्रसार होण्याचा वेग कमी झालाय हे यातून स्पष्ट होतंय. दरम्यान,  राज्यातील मृत्यूदर ३.३७ टक्के आहे.

यासोबतच, आणखी एक बातमी म्हणजे, बुधवारी चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत तापाचे व इतर आजारांचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाचे रुग्ण आणि इतर आजारांचे रुग्ण ओळखणे कठीण जाणार आहे.

कोरोनाचा भर ओसरत नाही तोच आता पावसाळी आजारांचा सामना करावा लागणार आहे. येत्या 8 ते 10 दिवसात हे सर्व आजार, तापाच्या रुपाने डोके वर काढणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तापाकडे दुर्लक्ष करू नये व स्वत: औषधोपचार करू नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले  आहे. त्यामुळे हळू हळू कोरोनाचा प्रभाव कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र आपण आपली काळजी स्वतःच घेणं महत्वाचं आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live