दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

covid19
covid19

पुणे - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे.  मात्र असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडणाऱ्या पुण्यात आज नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घाट झाली आहे.  corona patient in pune are recovering fast

पुणे शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोना या आजाराने  पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.  मात्र आता या रुग्ण वाढीतून पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकुण रुग्ण ३८० रुग्णांची नोंद झाली आहे तर ६४१ रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहे. तर १८ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे.

राज्यात आता रोजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.  corona patient in pune are recovering fast

पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ७१ हजार ९५७ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ८ हजार ३७९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ६४१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ४ लाख ५९ हजार ०१५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात सध्या ४ हजार ५६३ रुग्णांवर उपचार उपचार सुरु आहे. तर आज पुण्यात ६ हजार ९०९ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com