चंद्रपूरात कोरोना रुग्णाचा बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा- चंद्रपूर प्रवास..(पहा व्हिडिओ). 

संजय तुमराम
बुधवार, 14 एप्रिल 2021

कोरोना रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर असा धक्कादायक प्रवास करावा लागला आहे. या रुग्णाला  24 तासांहून अधिक काळ केवळ बेडसाठीची प्रतीक्षा करावी लागली आहे

चंद्रपूर : चंद्रपूर कोरोना Corona रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर Chandrapur-Telangana असा धक्कादायक प्रवास करावा लागला आहे. तरीही या रुग्णाला  24 तासांहून अधिक काळ केवळ बेडसाठीची प्रतीक्षा लागली आहे.Corona Patient Travelled from Telangana to Chandrapur for Bed

वरोरा येथील नरहरशेट्टीवार परिवाराने या परिस्थितीविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.  जिल्ह्यात कोरोना स्फोट झाल्यानंतरदेखील आरोग्य यंत्रणा ढिम्म असून या कालावधीत ना खाटा वाढल्या, ना ऑक्सिजन Oxygen,ना व्हेंटिलेटर... 

एकतर बेड आणि सुविधा द्या नाहीतर, इंजेक्शन Injection देऊन जीव घ्या, अशी काळीज फोडणारी भाषा बाधितांचे कुटुंबीय बोलून दाखवत आहेत. हा रुग्ण आज सकाळपर्यंत शासकीय वैद्यकीय महारुग्णालयाच्या कोविड उपचार केंद्राबाहेर रुग्णवाहिकेत होता. त्याची व अन्य अनेकांची अवस्था 'कुणी बेड देता का बेड' अशी झाली होती. Corona Patient Travelled from Telangana to Chandrapur for Bed

गेल्या २४ तासात चंद्रपुरात कोरोनाचा हाहाःकार बघायला मिळत आहे. ४३७० नमुने तपासणीतून आतापर्यतच्या विक्रमी १०१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासात १४ मृत्यू झाले, असून सक्रिय बाधितांची संख्या ६५४९ एवढी झाली आहे. एकूण मृत्यू ५१६ झाले, असून आरोग्य यंत्रणा एवढे बाधीत उपचार करताना कोलमडली आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live