दिलासादायक - विना रेमाडिसिविर १६ कोरोनाबाधित रुग्ण बरे..

दीपक क्षीरसागर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

लातुर जिल्ह्यात दिलासादायक कार्य समोर आलं आहे. रेमडिसिविर इंजेक्शन शिवाय १६ अत्यवस्थ रुग्णाला कोरोना मुक्त करण्याचं कार्य डॉक्टर व अधिपरिचरिकांनी केले आहे. यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे

लातूर : सध्याला कोरोनाचा Corona आजार रेमडिसिविर Remedies इंजेक्शन, ऑक्सिजनचे बेड यावरून सर्वत्र चिंताजनक स्थिती असतानाच, लातुर Latur जिल्ह्यात दिलासादायक कार्य समोर आलं आहे. रेमडिसिव्हर इंजेक्शन शिवाय १६ अत्यवस्थ रुग्णांना कोरोना मुक्त करण्याचं कार्य डॉक्टर व परिचरिकांनी केले आहे. यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. Corona patients are recovering in Latur Hospital

जिल्ह्यात दररोज किमान दीड हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यात डॉक्टरानी रेमाडिसिविर इंजेक्शनच दिलेलं प्रिस्क्रिप्शन व नातेवाइकांना होणार त्रास, तर ऑक्सिजन बेड यामुळे रुग्ण व नातेवाइकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी Prithviraj B.P यांनी १६ एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड तयार करून कोविड रुग्णालय सुरू केले. 

औसा Ausa या ठिकाणी आतापर्यंत ४० अत्यवस्थ रुग्ण दाखल झाले होते. ज्यात अनेकांचा सीटी स्कॅनमध्ये CT Scan काहींचा २० पेक्षा जास्त स्कोअर होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंगद जाधव Angad Jadhav यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सचितानंद रणदिवे Dr. Satchitanand Randive व डॉ मनीष कसपटे, सुजाता वाघमारे, योगेश्वरी जाधव, सरिता उबाळे, प्रतिभा इगवे, अश्विनी पुराणिक या स्टाफने उत्तम कार्य केले आहे. आरोग्य विभागाने सूचित केलेल्या निकषांवर औषधोपचार करत आज १६ अत्यवस्थ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. Corona patients are recovering

कोरोना वार्डात काम करताना सुरुवातीला भीती वाटत होती, पण या कामात समाधान मिळत असल्याचे नर्सेस सांगत आहेत. आज औसा तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्ण ऑक्सिजनवर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याच्यावर रेमाडिसिविर शिवाय उपचार होत असून प्रकृती उत्तम होत आहे, तर अनेकजण कोरोना मुक्त झाल्याने नातेवाईक समाधानी आहेत.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live