कोरोना रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही - नीतिन तड़स

covid19
covid19

बुलढाणा - सध्या महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसोबतच आता मृतांच्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणातही वाढ होत. बुलढाणा Buldhana जिल्ह्यात कोरोनाचा कहर चांगलाच वाढला आहे. शहरासोबतच आता ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने रुग्णांच्या संखेत भरमसाठ वाढ झाली आहे. Corona patients have no reason to panic

मागील वर्षापेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती त्यामुळे  बुलढाण्यात रुग्णालय कमी पडू लागले होती, मात्र यावर मात करुण अत्यल्प कालावधीत आरोग्य विभागाने मोठी कामगिरी करुण दाखविली आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात 6 शासकीय कोविड सेंटर Covid Center उभारण्यात आले आहे.  त्यात एकूण 3400 बेड असून त्यापैकी 923 ऑक्सीजन बेड Oxygen Bed आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध झाल्याने प्रत्येकाला औषधासह Medicine सर्व सुविधा मिळत आहेत. ऑक्सीजन पुढील 10 दिवस पुरेल तसेच रेमिडिसिवर इंजेक्शन Vaccine पुढील 8 दिवस पुरतील एवढा साठा उपलब्ध असल्याने कोरोनाबाधित रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक नीतिन तड़स  Nitin Tadas यांनी दिली आहे.

तसेच कोणतेही दुखने अंगावर काढू नये न घाबरता तात्काळ डॉक्टर कडून तपासणी करुण घ्यावे कोरोनाचे प्राथमिक लक्षण दिसून आले तर तातडीने उपचार घेऊन लवकर बरे होता येईल त्यांमुळे जिल्ह्यातिल नागरिकांनी मनात कुठलीही भीती बाळगु नये असे आवाहन   जिल्हा शल्य चिकित्सक नितिंन तड़स यानी केले आहे. Corona patients have no reason to panic

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणातही वाढ होत. असे असले तर  गेल्या २४ तासात राज्यात ७१ हजार ७३६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय गेल्या २४ तासात राज्यात ४८ हजार ७०० नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर ५२४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. सध्या राज्यात ३९,७८,४२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com