दिलासादायक - मुंबईत कोरोना रुग्णवाढ स्थिरावली

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 25 एप्रिल 2021

मुंबईतील कोरोना रुग्णवाढ स्थिरावली असून, मृतांच्या आकड्यात मात्र वाढ सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा वाढला असून, काल दिवसभरात ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आतापर्यंतचा आकडा १२ हजार ७१९ वर पोहोचला आहे

मुंबई : मुंबईतील Mumbai कोरोना रुग्णवाढ स्थिरावली असून, मृतांच्या आकड्यात मात्र वाढ सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा वाढला असून, काल दिवसभरात ७१ रुग्णांचा मृत्यू Death झाल्याने मृतांचा आतापर्यंतचा आकडा १२ हजार ७१९ वर पोहोचला आहे. Corona Patients increase rate in Mumbai Becoming Stable 

काल मृत झालेल्यांपैकी ३४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये ३८ पुरुष, तर ३३ महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोन रुग्णांचे वय ४० च्या खाली होते. २४ रुग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील होते, तर ४५ रुग्णांचे वर ६० वर्षांच्या वर होते.

मुंबईत नव्या रुग्णांचा आकडा सहा हजाराच्या आत आला. काल ५८८८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ६,२२,१०९ वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा ७८,७७५ हजारांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर १.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. Corona Patients increase rate in Mumbai Becoming Stable 

मुंबईत कोरोना Corona चाचण्यांवर भर देण्यात येत असून, आतापर्यंत ५२,०३,४३६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर १.२६ टक्के आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन ५४ दिवसांवर आला आहे. मुंबईत गुरुवारी ८५४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत ५,२९,२३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ७८,७७५ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

मुंबईत १२२ इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन Contaiment Zone म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १२११ इतकी आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात २४,९१७ अतिजोखमीचे व्यक्ती आले आहेत. Corona Patients increase rate in Mumbai Becoming Stable 

जी उत्तरमध्ये १५५ नवे रुग्ण
जी उत्तरमध्ये आज १५५ नव्या रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्णसंख्या २३५७७ झाली आहे. धारावीत Dharavi काल २८ नवीन रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६२८८ वर पोहोचली आहे. दादरमध्ये Dadar काल ५४ नव्या रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्णांची संख्या ८५९९ झाली आहे. माहीममध्ये Mahim ७३  रुग्ण सापडले असून, एकूण रुग्ण ८६९० इतके रुग्ण झाले आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live