धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचं बायको मुलासह पलायन

भूषण अहिरे
गुरुवार, 7 मे 2020

यावेळी त्याने आपली गर्भवती पत्नी आणि चार वर्षीय मुलासह हॉस्पिटलमधून पोबारा केलाय. या घटनेने पोलिसांसह आरोग्य प्रशासन यंत्रणा हादरली असून या फरार रुग्णाचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय.

धुळे - धुळ्यात उपचार घेत असलेला कोरोनाबाधित रुग्ण पळल्याने खळबळ माजलीय. या बावीस वर्षीय रुग्णावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. यावेळी त्याने आपली गर्भवती पत्नी आणि चार वर्षीय मुलासह हॉस्पिटलमधून पोबारा केलाय. या घटनेने पोलिसांसह आरोग्य प्रशासन यंत्रणा हादरली असून या फरार रुग्णाचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. मध्य प्रदेशला जाताना या तरुणाचा अपघात झाला होता. त्यानंतर या जखमी तरुणाचा रिपोर्ट काढला असता, त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती.

 

औरंगाबेदतही रुग्ण वाढले

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज नव्या सतरा कोरोनाग्रस्तांची भर पडल्याने, शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 373 पोहोचलाय. औरंगाबाद शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. दररोज अतिशय झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. डेंजर हॉटस्पॉटमध्ये संजयनगर मुकुंदवाडी, किलेअर्क, जयभीम नगर या भागांचा समावेश झालाय. त्यात दररोज नवीन हॉटस्पॉटची भर पडत आहे. या सर्व प्रकारांमुळे महापालिका आणि आरोग्य प्रशासनाची झोप उडालीय.

 

corona positive patient escape with familiy dhule maharashtra marathi covid 19 india hospital health 

अकोल्यात चिंता वाढली

अकोल्यात आज आणखी 6 रुग्णांची वाढ झालीय. तर गेल्या 24 तासात 13 रुग्ण वाढलेत आणि 4 मृत्यूची नोंद झालीय. कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 10 वर पोहोचली, तर एका कोरोनाग्रस्तानं आत्महत्या करु आपलं जीवन संपवलंय.गेल्या 7 दिवसांत इथं 60 रुग्णांची भर पडलीय...त्यामुळे पोझिटिव्ह रुग्णांचा आकडा 88 वर गेलाय. अकोल्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढतायत, त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरलंय.
 

कराडमधील रुग्णसंख्या 70च्या पार

कराड तालुक्यात आणखी 2 जण पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने दोघांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील रूग्णांची संख्या 72वर पोहोचली आहे. कराडमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. तर सातारा शहरातही एका रुग्णाची भर पडलीय. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने एकाला लागण झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 93 रुग्ण कोरोना बाधित


संबंधित बातम्या

Saam TV Live