खळबळजनक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या... 

प्रसाद नायगावकर
शुक्रवार, 4 जून 2021

जिल्ह्यातील पुसद येथील कोरोना सेंटरमध्ये एका रुग्णानी आत्महत्या केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद Pusad येथील कोरोना Corona सेंटरमध्ये एका रुग्णानी आत्महत्या केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महागाव Mahagaon तालुक्यातील गुंज येथील रहिवासी बळीराम मोतीराम राठोड (वय ५५) असे मृतकाचे नाव आहे. Corona positive patient suicide

बळीराम हे कोरोना पॉझिटिव्ह Positive असल्याने त्यांना पुसद येथील एका खासगी दवाखान्यांमध्ये २८ मे या दिवशी भरती करण्यात आले होते. मात्र, खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक यांनी बळीराम राठोड यास उपजिल्हा रुग्णालय Hospital पुसद येथे ३० मे या दिवशी भर्ती करण्यात आले होते.

दिलासादायक! महाराष्ट्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6.37 टक्क्यांवर 

उपचारानंतर तब्येतीत मध्ये सुधारणा सुद्धा झाली होती. त्यानुसार, एक दोन दिवसात सोडणार सुद्धा होते. मात्र, दरम्यान रात्रीत बळीराम राठोड यांनी प्रसाधनगृहातील खिडकीच्या लोखंडी गजाला आपल्या शेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. Corona positive patient suicide

 हे देखील पहा 

ही बाब डॉक्टरांच्या राऊंड दरम्यान उघडकीस आली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस Police हजर झाले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बळीराम मोतिराम राठोड यांच्या पश्चात पत्नी, विवाहित 3 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे. पुसद पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.

Edited By- Digambar Jadhav 


संबंधित बातम्या

Saam TV Live