कोरोनामुळे जगभरातल्या उद्योगांना चाप, ऑनलाईन शॉपिंगला मात्र अच्छे दिन

साम टीव्ही
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020
  • कोरोनामुळे जगभरातल्या उद्योगांना चाप
  • चिनी उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र वाढ
  • ऑनलाईन शॉपिंगला आले अच्छे दिन

कोरोनाच्या तडाख्यात जगभरातला व्यापार उदीम थंडावलाय. गेल्या सात आठ महिन्यांपासून गाळात रूतलेल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अजूनही रुळावर आलेल्या नाहीत. पण चीनमधल्या उद्योगपतींच्या तिजोरीत मात्र कोरोनाकाळातही घसघशीत भर पडलीय. ई-कॉमर्स क्षेत्रातली दिग्गज कंपनी अलीबाबा चे संस्थापक आणि चीनमधले सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. 

जगभरातल्या श्रीमंतांची यादी तयार करणाऱ्या हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार जॅक मा यांची संपत्ती 2019 च्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढून 58.8 अब्ज डॉलरवर पोहोचलीय. तर व्ही चॅट सेवा देणाऱ्या टेन्सेन्ट कंपनीचे संस्थापक मा हुआतेंग हे 57.4 अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ झालीय. तर बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या नोंगफू स्प्रिंग या कंपनीचे अध्यक्ष झोंग शानशान हे 53.7 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

एकूणच कोरोनाच्या संकटामुळे जगभरातल्या उद्योगाचे हाल सुरू असताना चिनी उद्योगपती मात्र मालामाल झालेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live