गुड न्यूज - कोरोनाविजेते दोन कोटीपार!

साम टिव्ही ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

भारतात India कोरोनामुक्त Corona Free झालेल्यांच्या एकूण संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८३.५० टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत तीन लाख ४४ हजार ७७६ रुग्ण बरे झाले

नवी दिल्‍ली  : भारतात India कोरोनामुक्त Corona Free झालेल्यांच्या एकूण संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८३.५० टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत तीन लाख ४४ हजार ७७६ रुग्ण बरे झाले. गेल्या चार दिवसांत बरे झालेल्यांची संख्या ही रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने Health Ministry केला आहे.Corona Recovered Patients crossed Two Crore Mark

हे देखिल पहा - 

काल जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या ३७ लाख ४ हजार ८९३ पर्यंत घटली आहे. ही संख्या देशाच्या एकूण संक्रमित रुग्णसंख्येच्या १५.४१ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांत उपचाराधीन रुग्ण संख्येत ५ हजार ६३२ ने घट झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांपैकी ७९.७ टक्के रुग्ण हे बारा राज्यांत आहेत. आतापर्यंत १८ कोटी नागरिकांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

जाणून घ्या स्पुटनिक लसीची सध्याची किंमत

गेल्या चोवीस तासांत १८-४४ वर्षे वयोगटाच्या ४ लाख ४० हजार ७०६ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ३९ लख २६ हजार ३३४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. Corona Recovered Patients crossed Two Crore Mark

काल संपलेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे ४२ हजार ५८२ नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळमध्ये ३९ हजार ९५५, तर कर्नाटकमध्ये ३५ हजार २९७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ७२.७० टक्के मृत्यू हे दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ८५० जणांचा, तर कर्नाटकमध्ये ३४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live