कोरोना परतला पण मृत्यूदर कमी

साम टीव्ही
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

गेल्या वर्षभरापासून भारतात दाखल झालेल्या कोरोनाचा विषाणू आता कमजोर झालाय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतायेत. पण कोरोनाच्या मृत्यूदरात घट झालीय.

गेल्या वर्षभरापासून भारतात दाखल झालेल्या कोरोनाचा विषाणू आता कमजोर झालाय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतायेत. पण कोरोनाच्या मृत्यूदरात घट झालीय.

राज्यात कोरोना परतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. असं असलं तरी विषाणूंचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते कोरोनाचा विषाणू कमजोर झालाय. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या विषाणूची संक्रमण क्षमता वाढली तरी त्याचा प्रभाव कमी झालाय. 95 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणंच नाहीत. कोरोनाचा मृत्यूदरही 0.7 टक्के एवढा झालाय. गंभीर रुग्णांची संख्याही तुलनेनं अतिशय कमी झालीये. 

 कोरोनाच्या विषाणूची जनुकीय रचना बदलतेय. वर्षभरानंतर भारतातल्या कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव कमी होतोय.

 कोरोना कायमचा नष्ट होणार नसला तरी त्याचा प्रभाव नक्कीच कमी होईल असा तज्ज्ञांना विश्वास आहे.
 
फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live