अकोल्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; 54 गावे सील

akola n
akola n

अकोला : अकोला Akola जिल्ह्यातल्या District ग्रामीण भागात Rural Area कोरोना Corona रुग्णांची Patients संख्या झपाट्याने वाढत Increasing आहे. त्यामुळे शहराबरोबर आता ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातल्या सात ही तालुक्यातील सुमारे 54 गावांच्या Village सिमा Borders सील Seal करण्याचे आदेश दिले आहेत.Corona Is On The Rise In Akola 54 villages Sealed

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश दिले आहेत. आजपासून १ जुनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांनी करण्याचे आदेश दिले आहेत. 

हे देखील पहा -

शहराबरोबर आता ग्रामीण भागात देखील कोरोना संसर्ग वाढताना दिसतोय. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. छोटी छोटी घरे, ग्रामीण भागातील दाट वस्ती यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता जास्त आहे.  त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यांनी दहा पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असणार्‍या गावांमध्ये कोविड विषाणूचा प्रसार व फैलाव होऊ नये या करीता कडक निर्बंध लागू करण्याचे सुचविले होते.Corona Is On The Rise In Akola 54 villages Sealed

त्यानुसार ही 54 गावे प्रतिबंधात्मक गावे म्हणून घोषित करत त्या गावांच्या सिमा बंद करण्यात येत आहे. या गावात कडक निर्बंध लागू करण्यात येत असून तेथील सर्व व्यवहार बंद राहतील. 

प्रतिबंधात्मक आदेश लावण्यात आलेल्या गावांमध्ये अकोला तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. यात सांगवी, म्हैसपूर, डोंगरगांव, उगवा, सुकोडा, वणी रंभापूर, बोरगांवमंजु, बोरगाव खु., सोनाळा, हिंगणी बु. रोहणा, सांगळूद बु. कोठारी व येळवण या गावांचा समावेश करण्यात आला आहे. Corona Is On The Rise In Akola 54 villages Sealed

तर अकोट तालुक्यातील 10 गावांमध्ये सुकळी, लोहारी, अटकळी, अकोलखेड, रुईखेड, बोर्डी, चोहट्टा, अकोला जहा., दिवठाणा व नांदखेड या गावांचा समावेश आहे. बाळापूर तालुक्यातील 8 गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. यात मनारखेड, मोरगांव सा., पळशी खु., हिंगणा, व्याळा, वाडेगांव, पारस व मानकी गावाचा समावेश आहे.

बार्शिटाकळी तालुक्यातील 6 गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. यात तालुक्यात कातखेड, भेंडीमहल, खापाली, टेंभी, महान,खेर्डा खु. या गावांचा समावेश आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश असून यात सिरसो, मदापुरी, राजुरा सरोदे, दहातोंडा गावांचा समावेश आहे.Corona Is On The Rise In Akola 54 villages Sealed

पातूर तालुक्यातील 7 गावांचा समावेश असून यात असोला,सुकळी, अंबाशी, सस्ती, विवरा, चोंढी, सायवणी या गावांचा समावेश आहे. तेल्हारा तालुक्यातील 5 गावांमध्ये निंभोरा, बेलखेड, सौंदळा, हिवरखेड,वडगांव रोठे या गावांचा समावेश प्रतिबंधात्मक गावांमध्ये करण्यात आला आहे. या गावांमध्ये 1 जुन पर्यंत कडक निर्बंध जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लागू केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com