पुण्यातल्या मेसमध्ये कोरोना नियमांना हरताळ

साम टीव्ही
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021


मेस वर कारवाई करता मग अनेक दुकानात ही कुठली काळजी घेतली जात नाही .मेस वर कारवाई झाली असल्याने मुलांचे खाण्याचे हाल झालेत . 
 

 

पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरीनिमित्तानं एकटं राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांचं पोट चालतं मेसच्या डब्यांवर... लॉकडाऊननंतर या मेस पुन्हा सुरु झाल्यात. काही मेसचालक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचं पालिकेच्या पाहणीत आढळून आलं. त्यामुळंच सदाशीव पेठेतल्या एका मेसला पालिकेनं सील ठोकलं तसंच मेस मालकाला ५ हजारांचा दंड ठोठावला.

 मेसवर कारवाई सुरु केल्यानं मेसमध्ये जेवणारे विद्यार्थी आणि मेस चालवणाऱ्या लोकांचे धाबे दणाणलेत. मेस बंद झाल्यास जेवायचं कुठं असा सवाल विद्यार्थी आणि मेस चालकांकडून केला जातोय.

 मेस चालली पाहिजे पण त्यामाध्यमातून कोरोनाचा प्रसारही होऊ नये. मेस उघड्या राहाव्यात असं त्यांना वाटत असेल तर मेस चालक आणि ग्राहकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे.

मेस वर कारवाई करता मग अनेक दुकानात ही कुठली काळजी घेतली जात नाही .मेस वर कारवाई झाली असल्याने मुलांचे खाण्याचे हाल झालेत . 
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live