.... तर 'येथे' कोरोनाचा दुसरा डोस मिळेल विनामूल्य

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन कामगार आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीच्या खाजगी कोविड लसीकरण केंद्रात ३० एप्रीलपूर्वी पहिला कोविड डोस घेतलेल्यांना सरकारी लसीकरण केंद्रात दुसरा डोस विनामूल्य घेता येईल.

नवी दिल्ली: हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन कामगार आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीच्या खाजगी कोविड लसीकरण केंद्रात ३० एप्रीलपूर्वी पहिला कोविड डोस घेतलेल्यांना सरकारी लसीकरण केंद्रात दुसरा डोस विनामूल्य घेता येईल. Corona second dose will be free in CVC of Government

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे की, हेल्थकेअर वर्कर्स (एचसीडब्ल्यू) HCW, फ्रंटलाइन कामगार (एफएलडब्ल्यू) FLW, आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी खाजगी कोविड लसीकरण केंद्रात पहिला कोविड डोस घेतलेल्यांना दुसरा डोस शासकीय लसीकरण केंद्रात विनामूल्य मिळेल. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्निनी यांनी दिलेल्या पत्रानुसार प्राधान्य गटातील लाभार्थी खाजगी लसीकरण केंद्रात त्यांचे शुल्क भरून दुसर्‍या डोसचा लाभ घेऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. Corona second dose will be free in CVC of Government

६ जानेवारी पासून कोविड -१९ लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून भारतने तब्बल १५,६८,१६,०३१ लसींचे डोस दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींसाठी १ मेपासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पादेखील सुरु करण्यात आला आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live