2019 मध्येच चीनमध्ये झालेला होता कोरोनाचा फैलाव...चीननं माहिती लपवली...

साम टीव्ही
मंगळवार, 9 जून 2020

 

  • ऑगस्ट 2019 मध्येच चीनमध्ये झालेला कोरोनाचा फैलाव
  • डिसेंबरपर्यंत चीननं कोरोनाची माहिती लपवून ठेवली
  • हार्वर्ड मेडिकल स्कूलनं सादर केले पुरावे

चीनचा एक एक कपटीपणा आता जगासमोर येत चाललाय. डिसेंबरमध्ये चीननं कोरोनाची माहिती जगाला दिली होती पण कोरोनाचा प्रसार यापूर्वीच चीनमध्ये झाल्याचं आता संशोधनातून समोर आलंय.

चीनचा एक एक कपटीपणा आता जगासमोर येत चाललाय. २०१९ च्या ऑगस्ट महिन्यातच चीनमध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता पण चीननं जगापासून कोरोनाचा फैलाव लपवून ठेवला. 31 डिसेंबरला चीननं जगाला कोरोनाबद्दलची माहिती दिली पण तोपर्यंत अख्ख्या जगात त्याचा प्रसार झाला होता. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. 

हार्वर्ड मेडिकल स्कूलनं कमर्शियल सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीनं वुहान शहराच्या काही फोटोंचा अभ्यास केला. ही चित्रं 2019 च्या ऑगस्टमधील आहेत. वुहान शहरातील रुग्णालयांच्या बाहेर मोठ्या संख्येनं वाहने दिसतायंत. याच काळात कोरोनाचा उद्रेक चीनमध्ये होत होता आणि त्यामुळे रुग्णालयाबाहेर इतकी गर्दी दिसत असल्याचा दावा करण्यात आलाय.

डिसेंबर 2019 च्या सुरूवातीस चीनने न्यूमोनियासारख्या आजाराबद्दल WHO ला सांगितलं होतं. 31 डिसेंबर रोजी चीननं कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची अधिकृत घोषणा केली. पण तत्पूर्वीच आज जशी गर्दी भारतातील किंवा जगातील अनेक देशातील रुग्णालयांबाहेर दिसतेय, तशी गर्दी चिनी रुग्णालयांबाहेर दिसत होती. पण जाणीवपूर्वक चीननं जगापासून कोरोनासंबंधीची प्रत्येक बाब लपवली. चीनला जगभर कोरोनाचा प्रसार होऊ द्यायचा होता. लालची चीनचा कपटीपणा आता समोर यायला सुरुवात झालीय.त्यामुळे चीनला चांगलाच धडा शिकवण्याची गरज आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live