पुण्यात MPSC आंदोलनामुळे पसरला कोरोना?पोलिस खात्यातही कोरोनाचा मोठा शिरकाव

साम टीव्ही
बुधवार, 17 मार्च 2021

एमपीएससीच्या आंदोलनाने आरोग्य नापास?
पुण्यात आंदोलनामुळे पसरला कोरोना?
पोलिस खात्यातही कोरोनाचा मोठा शिरकाव

पुण्यात झालेल्या MPSC उमेदवारांच्या आंदोलनात कोरोना च्या नियमांचे उल्लंघन झाले होते. या आंदोलनानंतर पुणे पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं समोर आलंय. त्यामुळे, आंदोलनातील गर्दीमुळे हे पोलिस पॉझिटिव्ह झाले असल्याची चर्चा सुरूय.

 

 ही उसळलेली गर्दी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची आहे.परीक्षा पुढे ढकलल्याच्या रागातून विद्यार्थी आणि नेत्यांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यांवर उतरले.ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिग. परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांना जणू कोरोनाचा विसरच पडून गेला होता.कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच, ही गर्दी उसळली.मग पोलिसांचा बंदोबस्त हवाच ना. पोलिसही आले.आंदोलन संपलं. या आंदोलनामुळेच पुण्यात कोरोना जास्त पसरला असेल किंवा आंदोलन करायलाच नको होतं, असं आम्ही म्हणत नाही, पण, सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गात ही गर्दी, आंदोलनातली बेफिकीरी निश्चितच योग्य नव्हती. कारण, त्यानंतर मात्र, पुण्यात कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आणि या खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा पडलाय.
 
आतापर्यंत पुण्यात 1 हजार 530 पोलिसांना कोरोना झालाय, पुण्यातील 42 पोलीसांवर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. बंदोबस्त, नाकाबंदीसह अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

 

आंदोलन हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आंदोलनं केली पाहिजेतच, नाही असं नाही, पण, ती करताना कोरोनाचा विसर पडायला नको. खरंतर, पुण्यात आलेले अनेक विद्यार्थी ग्रामीण भागांतून येत असतात. त्यामुळे, त्यांच्या गावाकडच्या नातेवाईकांना त्यांची काळजी लागून राहिलेली असते. म्हणूनच, कोरोनाच्या काळात जास्तीची काळजी घ्यायला हवी.अर्थात, अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या याचा विसर पडता कामा नये. कारण, कोरोनाने एकदा पकडलं तर त्याचं उत्तर शोधणं अजूनही म्हणावं तितकं तितकं सोपं नाहीय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live