सावधान! एटीएममधून पसरतोय कोरोना!

साम टीव्ही
बुधवार, 20 मे 2020
  • एटीएम बनतायंत कोरोना संक्रमणाचा अड्डा
  • ना सोशल डिस्टन्सिंग, ना निर्जंतुकीकरण
  • एटीएममधील एसीमुळे संक्रमणाचा धोका दुप्पट

तुम्ही पैसे काढण्यासाठी वारंवार एटीएम वापरत असाल तर ही बातमी पाहाच. एटीएम केंद्र  कोरोना संक्रमणाचा अड्डा बनत आहेत. कशी? पाहा...

कोरोना संकटाच्या काळात पैसे काढण्यासाठी बँकांपेक्षा एटीएमना प्राधान्य दिलं जातंय. पण हीच एटीएम केंद्र कोरोनाचा संक्रमणाचा अड्डा बनत चालली आहेत. राज्यातील अनेक एटीएम सेंटरमध्ये निर्जंतुकीकरणाची कोणतीही सोय नाही. पैसे काढण्यासाठी आलेले नागरिकदेखील सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळत नसल्याचं दिसून येतंय. लोकांचं स्क्रिनिंग करणं, हातावर सॅनिटायझर देणे, अशी कोणतीच खबरदारी बहुतांश एटीएममध्ये घेतली जात नाहीये.

दररोज शेकडो नागरिकांकडून एकेका एटीएमचा वापर होतो. एटीएम सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असूनही बहुतांश बँकांच्या प्रशासनाचं याकडे कोणतंही लक्ष नाही. दुसरीकडे एटीएम केंद्र वातानुकुलित असतात, त्यामुळे इथं पैसे काढणाऱ्या लोकांपैकी एखादा व्यक्ती जरी पॉझिटीव्ह निघाला तर मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे एटीएम सेवा ही कोरोना संक्रमणाचा अड्डा बनत चाललीयेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live