मुंबईत कोरोना वेगाने पसरतोय 

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 13 मे 2020

एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. यापैकी २३१ बाधित क्षेत्रांत १४ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून न आल्याने ही क्षेत्र वगळण्यात आली. परिणामी, २७ एप्रिलपर्यंत मुंबईमधील बाधित क्षेत्रांची संख्या ८०५वर आली होती. परिसरातील रहिवाशांना बाहेर जाण्यास तसेच बाहेरच्यांना आत येण्यास परवानगी दिली जात नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा चाचणी अहवाल, त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. 

मुंबई : कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण सापडताच सदर व्यक्ती राहत असलेली इमारत, चाळ परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते. या ठिकाणी आतल्या रहिवाशांना बाहेर जाण्याची परवानगी नाही आणि बाहेरच्या लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा सशुल्क पद्धतीने भागविण्यात येत आहेत. पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयामार्फत याबाबत नियोजन केले जात आहे. या परिसरात सर्व संशयित लोकांची चाचणी करून त्यांचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्या परिसरात प्रवेशबंदी लागू असते.

एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. यापैकी २३१ बाधित क्षेत्रांत १४ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून न आल्याने ही क्षेत्र वगळण्यात आली. परिणामी, २७ एप्रिलपर्यंत मुंबईमधील बाधित क्षेत्रांची संख्या ८०५वर आली होती. परिसरातील रहिवाशांना बाहेर जाण्यास तसेच बाहेरच्यांना आत येण्यास परवानगी दिली जात नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा चाचणी अहवाल, त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. 
मात्र आतापर्यंत मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजारांवर गेला आहे. तर ५२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या काळात बाधित क्षेत्रांचा आकडाही दोन हजार ६००वर पोहोचला आहे. मात्र काही विभागांमध्ये विशेषत: दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर संबंधित इमारत अथवा चाळीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो.

दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रूग्णांची संख्या अधिक वाढतेय.  बाधित क्षेत्राचा आकडा गेल्या दोन आठवड्यात दोन हजार ६००वर पोहोचला आहे. यापैकी जी उत्तर विभागात धारावी, माहीम, दादर परिसरात सर्वाधिक ३७० बाधित क्षेत्र आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेमार्फत अनेक उपाययोजना सुरू आहेत.

WebTittle :: Corona is spreading rapidly in Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live