सावधान.. ! आता हवेतूनही पसरतोय कोरोना?

साम टीव्ही
सोमवार, 6 जुलै 2020

 

  • सावधान.. ! हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग ?
  • विषाणूचे छोटे कण हवेतही राहतात जिवंत ?
  • 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती 

कोरोना विषाणूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीय. हवेच्या माध्यमातूनही कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. संशोधकांनी कोरोनाबाबत नेमकं काय म्हंटलंय.

कोरोना संकटानं साऱ्या जगाच्या नाकी नऊ आणलेत. कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप ठोस लस तयार झालेली नाहीत. अशातच हवेच्या माध्यमातूनही कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. कोरोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, असं शास्त्राज्ञांनी स्पष्ट केलंय. 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी एक संशोधन केलं असून त्यामध्ये ही महत्वाची बाब समोर आलीय. या शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत एक सविस्तर पत्र लिहून आपल्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचं म्हंटलय. 

2019च्या वर्षाअखेरीस चीनमधील वुहान इथं कोरोना व्हायरस आढळून आला होता. यानंतर आता जवळपास सर्वंच जगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेने मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हा दावा खरा असेल तर निश्चितच सर्वांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live