सावधान! हवेतूनही होतोय कोरोनाचा प्रसार...थुंकीतून असा पसरतोय कोरोना...

साम टीव्ही
शनिवार, 16 मे 2020
  •  
  • हवेतूनही होतोय कोरोनाचा प्रसार
  • 8 मिनिटं हवेत राहतात विषाणू
  • बोलताना थुंकीतल्या बिंदुकांतून कोरोना पसरतोय

कोरोनाचा प्रसार हवेतूनही होत असल्याचं संशोधनातनं समोर आलंय. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या या संशोधनामुळे एकच खळबळ माजलीय.

हवेतूनही कोरोनाचा प्रसार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. कोरोनाबाधित रुग्णानं संभाषण केलं असता, त्याच्या तोंडातून निघालेल्या थुंकीच्या बिंदुकातून कोरोना विषाणू हवेत पसरत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. 

एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती जेव्हा बोलते, तेव्हा त्या व्यक्तीच्या आसपासच्या परिघातील हवेत एक हजार कोरोना विषाणूंचा समावेश असणारी थुंकीची बिंदुकं पसरतात

थुंकीची बिंदुकं 8 मिनिटं हवेत राहू शकतात

कोरोनाबद्दल जागतिक स्तरावर सुरु असलेला संशोधनादरम्यान नवनवीन गोष्टी समोर येतायत. आता बोलताना श्वासोच्छवासा दरम्यान बाहेर पडणाऱ्या छोट्या थेंबाद्वारेही कोरोनाचा प्रसार शक्य असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून पुढं आलाय. त्यामुळे एक नवं आव्हान उभं ठाकलंय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live