आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करा कोरोना टेस्ट

साम टीव्ही
मंगळवार, 7 जुलै 2020
  • डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करा कोरोना टेस्ट
  • मुंबई महापालिकेकडून प्रिस्क्रिप्शनची अट रद्द 
  • कोरोनाबाधितांचा तात्काळ शोध घेण्यासाठी निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. कोरोनावर लस तयार केल्याचे आतापर्यंत अनेक दावे केले गेलेत. मात्र कोरोनावर कोणीही लस किंवा औषध बाजारात नाही.

अशा परिस्थितीत कोरोना रुग्णाचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर उपचार कऱण्याचा पर्याय उरतो. सध्याच्या घडीला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेनं आपल्या नियमांत बदल करत कोरोना टेस्टसाठी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेण्याची अट काढून टाकलीय. यापुढे संशयित रुग्णांना कोरोना टेस्टसाठी  प्रिस्क्रिप्शनची गरज लागणार नाही.

मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेल्यानं पालिकेनं  ई-प्रिस्क्रिप्शनची सूट  दिली. शिवाय ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याने त्यांच्यासाठी प्रिस्क्रिप्शनची अट नव्हती. मात्र इतरांसाठी प्रिस्क्रिप्शन असेल तरच टेस्ट केली जात होती.. आता मात्र परिस्थिती बदलीय. मुंबई कोरोना रुग्णांचा कहर वाढतोय. त्यामुळे कोरोनाचं संकट रोखण्याचं मोठं आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे. आता  प्रिस्क्रिप्शन संदर्भात घेतलेल्या या निर्णयानं किती फायदा होतोय हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live