CORONA UPDATE | तुम्हाला डोळे आलेत? मग कोव्ही़ड टेस्ट केली का?

साम टीव्ही न्यूज
रविवार, 31 मे 2020

भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले की, त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती; तसेच अनेक नेत्ररोग तज्ज्ञांनी डोळे आलेल्या म्हणजे कंजक्टिवायटीस झालेल्या रुग्णांना कोरोनाची शंका व्यक्त केली व तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले

 

मुंबई : डोळे येण्यासाठी औषध दुकानातून प्रिस्क्रिपशन व नेत्र रोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ओव्हर द काऊंनटर डोळ्याचे ड्रॉप घेणे हे सर्रास केले जाते; पण साथीच्या या काळात व इतर वेळीही असे मुळीच करू नये. याने डोळ्यांना इजा होऊ शकते .
चीनमध्ये व जगात पहिल्यांदा ‘कोरोना’बद्दल जाहीरपणे नव्या व घातक विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे, असा सूतोवाच करणारे डॉ. ली वेनलीआंग हे नेत्रतज्ज्ञच होते. पुढे त्यांचा ही कोरोनाने मृत्यू झाला. आज दु:खाची गोष्ट म्हणजे, डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते, याबद्दल अजून अनेकांना पुरेशी माहिती नाही.

भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले की, त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती; तसेच अनेक नेत्ररोग तज्ज्ञांनी डोळे आलेल्या म्हणजे कंजक्टिवायटीस झालेल्या रुग्णांना कोरोनाची शंका व्यक्त केली व तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले. महाराष्ट्
आॅफथॅल्मिक सोसायटीचे राज्याचे सचिव नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया सांगतात की, सध्या साथीच्या वातावरणात डोळे आलेला रुग्ण कोरोनाचा असू शकतो ही शक्यता आहे. त्यातच जर तुमचा कोरोना रुग्णाशी संपर्क आला असेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे कोरोना असल्याचे निदान झाले असेल व तुमचे डोळे आले असतील, तर हेच लक्षण कोरोनाची सुरुवात असू शकते. अजून डोळे येणे या लक्षणाची कोरोनासाठी टेस्टिंग करण्याच्या निर्देशात समावेश नसला, तरी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तो करण्याची गरज आहे.

 

WebTitle :: CORONA UPDATE | Do you have eyes So did you do the coveted test?


 

संबंधित बातम्या

Saam TV Live