देशभरातले कोरोना अपडेट, वाचा कुठे किती रुग्ण वाढले...

साम टीव्ही
शुक्रवार, 22 मे 2020

मागील 24 तासात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ झालीय. काल दिवसभरात 6 हजार 88 रुग्ण वाढले, त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या  1 लाख 18 हजार 447 वर पोहोचलीय.  तर 148 जणांचा बळी गेलाय.

मागील 24 तासात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ झालीय. काल दिवसभरात 6 हजार 88 रुग्ण वाढले, त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या  1 लाख 18 हजार 447 वर पोहोचलीय.  तर 148 जणांचा बळी गेलाय. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 583 लोकांचा मृत्यू झालाय. आणि सध्या भारतात 66 हजार 330 रुग्ण उपचार घेतायत. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ झाली.
दुसरीकडे राज्यात मागील 24 तासात  1 हजार 408 रूग्ण बरे होऊन घरी परतलेत.. ही रुग्ण बरे होणाऱ्यांची विक्रमी संख्या ठरलीय. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रूग्णांची एकुण संख्या 11 हजार 726 झालीय.  त्याचबरोबर राज्यात काल 2 हजार 345 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालीय. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 642 वर पोहचलीय. तर दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढतोय. पुणे शहरात गेल्या 12 तासात कोरोनाचे आणखी 47 रुग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढलीय. 47 जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4856वर पोहोचलाय. तर आतापर्यंत 242 जणांचा  कोरोनामुळे मृत्यू झालाय.

अकोल्यातही कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे आतापर्यंत अकोल्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 23 वर जाऊन पोहोचलाय. त्यापैकी एकाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केलीये. मरण पावलेली 50 वर्षीय महिला अकोल्याच्या नायगाव येथे राहणारी आहे. तर 52 वर्षीय व्यक्ती बाळापूर रोड येथे राहणारी आहे. दरम्यान आकोल्यात आज पुन्हा नव्याने कोरोनाचे 8 रुग्ण आढळलेत. त्यामुळे अकोल्यात कोरोनाबाधितांचा आकडा 349 वर जाऊन पोहोचलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live