कोरोना रुग्णसंख्येत आता भारत जगात तिसऱ्या स्थानी, देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार

साम टीव्ही
सोमवार, 6 जुलै 2020

रुग्णसंख्येत आता भारत जगात तिसऱ्या स्थानी पोहोचलाय. रविवारी भारताच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला.गेल्या 24 तासांत भारतात सर्वाधिक रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत भारताने आता रशियालाही मागे टाकलंय.

कोरोना रुग्णसंख्येत आता भारत जगात तिसऱ्या स्थानी पोहोचलाय. रविवारी भारताच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला.गेल्या 24 तासांत भारतात सर्वाधिक रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत भारताने आता रशियालाही मागे टाकलंय. covid19india.org या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार भारतात रुग्णसंख्या आता कमालीची वाढळी आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात सध्या 6 लाख 90 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

येत्या 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरची लस बाजारात येईल, असा दावा करणाऱ्या केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आता आपला दावा मागे घेतलाय. त्यामुळे  ICMR आणि केंद्रीय  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या दाव्यात विसंगती दिसून आलीय. सर्व चाचण्यांती येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही लस विक्रीसाठी उपलब्ध असेल अशी शक्यता ICMR ने वर्तावली होती. तर केंद्रीय मंत्रालयाने 2021 पर्यंत लस उपलब्ध होईल असा दावा आपल्या प्रेस रिलीजमध्ये केला होता. मात्र ICMR च्य़ा दाव्यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केले. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाने आपल्या प्रेस रिलीजमधून 2021 पर्यंत लस उपलब्ध होण्याबाबतचा उल्लेख गाळलाय. त्यामुळे कोरोनाच्या लसीबाबतचा संभ्रम आणखीनच वाढलाय. 
महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लस बाजारात येण्यात १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबत अंदाज व्यक्त केलाय...लसीची प्रक्रीया पूर्ण करण्यात 6 ते 9 महिने लागतील...ज्यामध्ये फेज 1 आणि 2 चा समावेश आहे...आणि त्यानंतर मानवी चाचण्या ज्या फेज 3 मध्ये येतात त्या पूर्ण होण्यात 12 ते 18 महिन्यांचा कालाधी लागू शकतो. भारत बायोटेकला फक्त फेज 1 आणि 2 ची परवानगी देण्यात आलीय. मात्र फेज 3 ची परवानगी अद्याप दिली गेली नसल्याचं स्वामीनाथन यांनी सांगितलंय.

राज्यात काल 6 हजार 555 कोरोना रूग्णांची नोंद झालीय. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या 2 लाख 6 हजार 619  इतकी झालीय. राज्यात गेल्या 24 तासांत 151 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्यूदर 4.27 टक्के इतका आहे.  दिवसभरात 3 हजार 658 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजच्या घडीला 86 हजार 40 रूग्ण ऍक्टीव्ह रूग्ण आहेत. आजच्या घडीला 6 लाख 4 हजार 463 लोक होम क्वारंटाईन आहेत. 

मुंबईत दिवसभरात १ हजार ३११ नवीन रुग्ण आढळलेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८३ हजार १२५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे २ हजार ४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ५५ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live