CORONA | वाचा महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचे महत्वाचे अपडेट्स...

CORONA |  वाचा महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचे महत्वाचे अपडेट्स...

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीची. बुधवारी राज्यात एकूण 597 नवीन कोरोनाबाधितांचं निदान झालंय, राज्यभरात एका दिवसात 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यातील रुग्णांची संख्या 9 हजार 915 वर गेलीय. तर मुंबईतील रुग्णांचा आकडा 6 हजार 644 वर गेलाय. दिलासादायक बाब म्हणजे 205 रुग्ण काल दिवसभरात बरे होऊन घरी गेलेत. 

मुंबईकरांसाठी अल्पसा दिलासा

दरम्यान असं असताना, मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा वेग काहीसा मंदावलाय. मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी 10 दिवसांवर गेलाय. तर
मृत्यूदर ६.३ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर आलाय. त्यामुळे मृत्यूदरही कमी झालाय. 
मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र शासननियुक्त समितीने काढलाय. या निष्कर्षांनुसार आधी 8.3 दिवस असा असलेला रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १७ ते २७ एप्रिल दरम्यान दहा दिवसांवर गेला आहे. देश पातळीवर तो ९.५ दिवस आहे. तर राज्याचा कालावधी ८.९ दिवस इतका आहे.
शहरातील बाधित रुग्णांचा मृत्यूदर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. राज्याचा मृत्यूदर दर शंभर बाधित रुग्णांमागे सरासरी ४.३ आहे. तर मुंबईत तो सरासरी ३.९ टक्के झाला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर दक्षिण मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. पश्चिम उपनगरासह काही भागाना कंटेनमेन्ट झोड घोषित करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे, मुंबईतील छोट्या छोट्या भागातून एकत्रितपणे होणारा कोरोनाचा उद्रेक मोठा असल्याचं केंद्राच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. 

3 मेनंतर होणार हे बदल

3 मे नंतर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील आर्थिक घडी बसवणे आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी. महत्त्वाची पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. तीन मे नंतर नवीन मार्गदर्शक सूचना मिळण्याची शक्यता असून, या नव्या सूचनांमध्ये ऑरेंज, ग्रीन झोनमधील बऱ्याच जिल्ह्यांना दिलासा मिळू शकतो. ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आणि ज्या परिसरांमध्ये अठ्ठावीस दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, अशा भागांसाठी मोठा निर्णय ४ मे पासून अपेक्षित आहे. जिथे 14 दिवसांपेक्षा जास्त काळ नवीन संक्रमण झाले नाही अशा ऑरेंज झोनलाही याचा फायदा होईल. ‘रेड’ झोनमधील नागरिकांसाठीसुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.. मात्र हे निर्णय हॉ़टस्पॉटबाहेरील नागरिकांसाठीच असतील. देशातील रेड झोनपैकी १२९ जिल्हे असे आहेत, जिथून देशाचे आर्थिक व्यवहार सुरू असतात. त्यामुळे या भागांवर केंद्राचं अधिकाधिक लक्ष असणार आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नईसारख्या रेडझोनमधील शहरांना मर्यादित स्वरुपात दिलासा मिळू शकतो. यांत किराणा, भाजीपाला आणि घरगुती उपयोगी वस्तूंचा समावेश असू शकतो. सूत्रांनी सांगितले की 3 मे नंतर उड्डाणे आणि ट्रेन्स त्वरित पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता नसली. तरी आणखी काही उद्योगांना काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com