कोरोनावर मात करण्यासाठी लशीकरण सुरू, एका इंजेक्शनची किंमत 4400 रूपये  वाचा कुठे दिली जातेय कोरोनावर लस?

साम टीव्ही 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020
  • कोरोनावर मात करण्यासाठी लशीकरण सुरू 
  • चीनमध्ये दिली जातेय कोरोनावर लस
  • एका इंजेक्शनची किंमत 4400 रूपये 

कोरोना लसीची प्रतीक्षा सारं जग करतंय. अनेक लसी या अंतिम टप्प्यात आहेत. पण जगात एक असाही देश आहे, जिथं प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात झालीय. 

कोरोनावर लस कधी येणार याची तुम्ही आम्ही सारेच जण प्रतीक्षा करत आहोत. ऑक्सफर्डपासून ते फायझरपर्यंत अनेक कंपन्यांची लस अंतिम टप्प्यात आहे. भारतात लशीच्या चाचण्या यशस्वी होताच व्यापक स्वरूपात वितरण करण्यासाठी सीरमनं कंबर कसलीय. पण या सर्वांमध्ये आघाडी घेतलीय ती चीननं. इमर्जन्सी ऍप्रुव्हलच्या माध्यमातून चीननं तिथल्या लोकांना लस देण्यास सुरूवात केलीय. 

सिनोवॅक बायोटेकनं विकसित केलेल्या या लशीचं नाव CoronaVac असं आहे. चीन सरकारनं  झेजियांग प्रांतातल्या जियाशिंग शहरात लसीकरणाची मोहिम सुरू झालीय. सुरूवातीच्या टप्प्यात ही लस आरोग्य कर्मचारी, पोलिस, तसच साथीच्या रोगासाठी काम करणाऱ्या लोकांनाच दिली जाणारंय. या लशीच्या एका इंजेक्शनची किंमत 60 डॉलर म्हणजे 4400 रूपये इतकी आहे. 

खरंतर कोणतीही लस येण्यापूर्वी तिच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सरकारी स्तरावर आवश्यक ती परवानगी मिळणं आवश्यक आहे. मात्र चीनमध्ये या लशीला आपात्कालीन परिस्थिती अंतर्गत तातडीनं मान्यता देण्यात आलीय. ज्या चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभर पसरला त्याच चीनमध्ये सारं काही सुरळीत सुरू आहे. त्यात आता लशीकरण मोहिम हाती घेऊन चीननं जगाला आणखी एक धक्का दिलाय. त्यामुळे कोरोनाला जन्म देणाऱ्या चीनची ही एक खेळी तर नाही ना? अशी शंका उपस्थित व्हायला नक्कीच वाव आहे.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live