१० मिनिटात दोन वेळा दिली कोरोना लस, दौसा येथील महिलेचा आरोप 

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 29 मे 2021

लसीकरणासाठी  नागरिकांना लसीकरण केंद्रात जाऊन वाट पाहावी लागत आहे. असे असताना राजस्थानामध्ये एक थक्क करणारी घटना घडली आहे. राजस्थानातील दौसा येथे किरण शर्मा या महिलेला चक्क १० मिनिटांमध्ये दोन वेळा  लस देण्यात आली आहे.  सुदैवाने या महिलेला कोणताही साईड इफेक्‍ट जाणवलेला नाही. 

नवी दिल्ली - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे.  लाखो लोक कोरोनाने संक्रमित होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. Corona vaccine given twice in 10 minutes

कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम सुरू केली आहे. देशात लसीचा Vaccine तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. लसीकरणासाठी  नागरिकांना लसीकरण केंद्रात जाऊन वाट पाहावी लागत आहे. असे असताना राजस्थानामध्ये Rajasthan एक थक्क करणारी घटना घडली आहे. राजस्थानातील दौसा Dausa येथे किरण शर्मा या महिलेला चक्क १० मिनिटांमध्ये दोन वेळा  लस देण्यात आली आहे. सुदैवाने या महिलेला कोणताही साईड इफेक्‍ट Side effect जाणवलेला नाही.

किरण शर्मा यांच्या माहितीनुसार, त्यांना करोनाची पहिली लस लसीकरण केंद्रातील एका खोलीत बसल्याबरोबर देण्यात आली. त्यानंतर त्या आधार कार्ड तपासणाऱ्या महिलाकडे गेल्या तेव्हा ती कर्मचारी तिथे उपस्थित नव्हती. मात्र नंतर जेव्हा ती महिला आली तेव्हा तिने किरण शर्मा यांना त्यांचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक विचारला आणि लगेच कोरोना किरण शर्मा यांना दुसऱ्यांदा लस देण्यात आली. Corona vaccine given twice in 10 minutes

ओबीसी आरक्षण : राज्य सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

घरी आल्यानंतर  किरण शर्मा यांनी आपल्याला लसीचे दोन डोस दिल्याचे सांगितले, तेव्हा किरण यांच्या कुटुंबातील व्यक्तींना धक्का बसला. यानंतर किरण यांचे पती रामचरण यांनी या प्रकाराची तक्रार आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडे केली. कर्मचाऱ्याने असा काही प्रकार घडला असल्याचे मान्य करण्यास नकार दिला. Corona vaccine given twice in 10 minutes

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संचालक डॉ. नीलम मीणा या प्रकरणी म्हणल्या की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे आणि  त्यानुसार किरण शर्मा यांना कोरोनाची लस देण्यासाठी पिंच केले गेले तेव्हा रक्त बाहेर आले. त्यामुळे डॉक्‍युमेंट व्हेरिफिकेशननंतर किरण यांना परत पिंच करण्यात आले आणि  लस देण्यात आली.

Edited By - Shivani tichkule

 हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live