500 रुपयांत 'कोविशिल्ड' लसीचा डोस, "2021 च्या पहिल्या आठवड्यातकोरोनाची लस मिळणार"

साम टीव्ही
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020
  • 500 रुपयांत 'कोविशिल्ड' लसीचा डोस
  • सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावालांची माहिती
  • '2021च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डची लस येणार'

लवकरच कोरोना व्हायरसवरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यताय. 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डच्या कोविड 19 लसचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होतील. अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली. तसंच भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 पाहा व्हिडीओ सीरमच्या सीईओंनी दिलेली ही ंमाहिती-

 अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने सोमवारी जाहीर केले की कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी, अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live