केवळ 50 दिवसच राहणार कोरोना लसीचा प्रभाव, दर 2 महिन्यांनी घ्यावी लागणार कोरोना लस 

साम टीव्ही
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020
  • सावधान ! लवकरच संपतायेत कोरोनाच्या अँटीबॉडीज 
  • केवळ 50 दिवसच राहणार कोरोना लसीचा प्रभाव
  • दर 2 महिन्यांनी घ्यावी लागणार कोरोना लस 

तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील म्हणून गाफील राहू नका. कारण कोरोनासंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. त्यात जे 
म्हंटलं गेलंय ते ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. वाचा, काय आहे कोरोनासंदर्भातला नवा अहवाल -

कोरोनासंदर्भातल्या प्रत्येक बाबीवर संशोधक तसच अभ्यासक बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यातच आता कोरोनामुळे एखाद्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर त्या फार वेळापर्यंत टिकतीलच असं नाही असा धक्कादायक अहवाल समोर आलाय. अलिकडेच एका अभ्यासगटानं मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचं सर्वेक्षण केलं. त्यातून हा धक्कादायक अहवालसमोर आलाय. कोरोना लशीच्या संशोधनात त्रुटी राहून नयेत यासाठी हा अहवाल महत्वपूर्ण ठरू शकतो

अँटीबॉडीज आणि त्यांच कार्य? 
आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचं काम अँटीबॉडीज करतात. अँटीबॉडीज या इम्‍यूनो-ग्‍लोब्‍युलिंस नावाच्या प्रोटीनचे तत्व मानल्या जातात. तर शरीराला धोका निर्माण करणाऱ्या तत्वाला एंटिजन असं म्हंटलं जातं. मग ते व्हायरस, बॅक्टेरिया, केमिकल यापैकी काहीही असू शकतं अशावेळी आपल्या शरीरात अँटीबॉडीज एखाद्या सुरक्षारक्षकाप्रमाणे काम करतात. प्रत्येक वेगळ्या एंटिजनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज असतात. या अँटीबॉडीज त्या त्या एंटिजनला शोधून त्यांचा खात्मा करतात

कोरोनाविरोधातल्या याच अँटीबॉडीजवर संशोधन करत असतांना अभ्यासकांच्या लक्षात आलं की जेजे रूग्णालयातील 801 पैकी 28 आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरूवातीच्या टप्प्यात कोरोनाची लागण झाली होती. मात्र जूनमधल्या सर्वेक्षणाअंती त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजच नसल्याचं स्पष्ट झालं. 

जेजेच्या सर्वेक्षणातून एक गोष्ट स्पष्ट होतीय, कोरोनाविरोधात शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज लवकरच नष्ट देखील होतायेत. म्हणजेच कोरोनाची लस दिल्यानंतर या अँटीबॉडीज 50 दिवस टिकू शकतात. त्यामुळे उगीचच गाफील राहण्यापेक्षा प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेतलेली बरी.


संबंधित बातम्या

Saam TV Live