Corona Vaccines update: किती लोकांचे लसीकरण पूर्ण? ‘या’ राज्याने वाया घालविल्या सर्वाधिक कोरोना लसी

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

कोरोना लसींचे देशात आतापर्यंत किती डोस वाया गेले आहेत ? तसेच कोणत्या राज्यात सर्वाधिक लसी वाया गेल्या आहेत, यासंदर्भात देशाच्या  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केली आहे.
 

कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेचा Second Wave कहर देशात अद्यापही पूर्णपणे ओसरलेला नाही. नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट Recovery rate वाढला असला, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे आहेत. Corona Vaccine update released by the countrys Union Ministry of Health

कोरोनावरील नियंत्रणासाठी लस Vaccine हाच उत्तम पर्याय असल्याचे अनेक कंपन्यांकडून सांगितले जात आहे. म्हणूनच भारतासह India जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे.

हे देखील पहा -

भारताचा केवळ  विचार केल्यास, आताच्या घडीला कोव्हॅक्सिन  Covaxin , स्पुटनिक व्ही Sputnik V आणि कोव्हिशिल्ड Covishield  या लसींचा वापर लसीकरण मोहिमेत करण्यात येत आहे.  भारतात आतापर्यंत २० कोटी नागरिकांचे लसीकरण  पूर्ण झाले आहे.

याव्यतिरिक्त, देशात लसी वाया घालवण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने countrys Union Ministry of Health जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसींचे डोस वाया गेले आहेत. तर झारखंडमध्ये Jharkhand सर्वाधिक लसी वाया गेल्याची माहिती मिळाली आहे. Corona Vaccine update released by the countrys Union Ministry of Health

केंद्र सरकारने लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. झारखंड राज्याने पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लशींच्या तब्बल ३७.३ टक्के लसी वाया घालवल्या आहेत. तर एकूण ३०.२ टक्के लशी छत्तीसगडमध्ये वाया गेलेल्या आहेत.

आषाढी पायी पालखी सोहळ्यावर वारकरी ठाम...!

यासोबतच लस वाया घालवण्याचे प्रमाण तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात अधिक आहे. आत्तापर्यंत तामिळनाडूत १५.५ टक्के लसी, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के लसी, आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के इतक्या लसी वाया गेलेल्या आहेत. संपूर्ण भारत देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लसी ह्या वाया गेल्या आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री CM हेमंत सोरेन Hemant Soren यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केल्यानंतर ट्विट करत केंद्राची माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. कोविन पोर्टलवर योग्य डाटा काही तांत्रिक अडचणींमुळे पोहोचू शकला नाही. असे कारण त्यांनी दिले आहे.

आम्ही काळजी घेत आहोत की लसींची नासाडी होणार नाही. पण आकडेवारीत लस वाया घालवण्याचे प्रमाण चुकीचे दाखवले गेले आहे. एकूण लसींच्या ४.६५ टक्के लसी आतापर्यंत वाया गेल्या आहेत, असे स्पष्टीकरण हेमंत सोरेन यांनी दिले आहे.

देशभरात लसीकरणाचा आकडा २० कोटीच्या घरात गेला आहे. त्यापैकी लोकांना फक्त पहिला डोस ११.३ कोटी मिळाला आहे. तर, सुमारे ४.३५ कोटी लोकांना दोन्ही कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांना सुमारे २० कोटी डोसपैकी २० टक्के लस या देण्यात आल्या आहेत. १८ ते ४४ वयोगटातील ६.४ टक्के लस. आणि उर्वरित ४५ वर्षांवरील वयाच्या लोकांना ७३.६ टक्के डोस देण्यात आले आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live