कोरोनावरील संभाव्य लसीच्या वाटपाची तयारी सुरू , राज्य सरकार करतंय लसीकरणाचं नियोजन 

साम टीव्ही
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

 

  • कोरोनावरील संभाव्य लसीच्या वाटपाची तयारी सुरू 
  • राज्य सरकार करतंय लसीकरणाचं नियोजन 
  • आरोग्य यंत्रणांकडून मागवला कृती आराखडा 

जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. मात्र लवकरच हे संकट दूर होण्याची चिन्ह दिसतायेत. कोरोनावरील लस आता अंतिम टप्प्यात असून प्रत्येकाला ही लस मिळावी यादृष्टीने राज्य सरकारने नियोजन सुरू केलंय. 

कोरोनावर लस कधी येणार याकडे साऱ्या जगाचे डोळे लागलेत. काही नामांकित कंपन्यांची लस येण्याच्या मार्गावर आहे. अशातच राज्य सरकारकडूनही एक आशेचा किरण दिसतोय. कारण कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येकाला ती मिळावी यादृष्टीनं राज्य सरकारनं पूर्वतयारी सुरू केलीय. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेकडून कृती आराखडा मागवलाय. 

यात लस देण्यासाठी किती कर्मचारी आहेत, किती आरोग्य केंद्रांवरून ती देता येईल याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं घ्यायला सुरुवात केलीय. यासंदर्भात शासनानं राज्यातील सर्व जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महापालिका, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयांकडून कृती आराखडा मागितलाय.. यात कोरोना लस ठेवण्यासाठी शासकीय कोल्ड स्टोअरेजसह खाजगी कोल्ड स्टोअरेजही ताब्यात घेण्याचं नियोजन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सुरु आहे..

कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीनं राज्यातील प्रत्येक मोठ्या शहरात, तालुक्याच्या ठिकाणी, गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने यातील कोल्ड स्टोअरेजची आकडेवारी जमा केली जातेय. राज्यातील मोठ्या शहरांसह लहान शहरात खाजगी दवाखानेही लसीकरणासाठी सज्ज केले जातायेत. त्यामुळे लस मिळण्यासाठी आता फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही हेच यातून अधोरेखित होतंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live