केवळ लशीमुळे कोरोनावर मात करणे शक्य नाही - WHO च्या प्रमुखांचा दावा

साम टीव्ही
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

“कोरोनाशी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र, त्यांची जागा घेऊ शकणार नाही.

केवळ लशीमुळे कोरोनावर मात करणे शक्य नाही असा दावा WHO च्या प्रमुखांनी केला. जगाचं लक्ष लशीकडे लागलेलं असताना या विधानामुळं संभ्रम निर्माण होऊ शकतो.

“कोरोनाशी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र, त्यांची जागा घेऊ शकणार नाही. केवळ लस ही स्वतः ही महामारी संपवू शकत नाही असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस घेब्रेसस यांनी केलं आहे.

विषाणूचे अस्तित्व येत्या काळातही कायम राहणार आहे. त्यामुळे लोकांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार आहे असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान सध्या कोरोना रुग्णांची संख्य वाढत असली तरी, बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढतेय. त्यामुळे येत्या काही काळात कोरोना हा कमी होईल अशी आशा होती, मात्र आता WHOच्या प्रमुखांनी असा दावा केल्यानं आरोग्ययंत्रणा चिंतेत पडल्यात. त्यामुळे आता कोरोनावर मात कशी करता येईल याचाच विचार सर्व करतायत. 

पाहा, यासंर्भात महत्वाची बातमी 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live