कोरोना लस बनवण्यासाठी आता लाखो किड्यांचाही बळी जाणार, रेशीम किड्यांपासून तयार होणार कोरोना लस

साम टीव्ही
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020
  • कोरोनामुळे आता किड्यांचाही जाणार बळी?
  • रेशीम किड्यांपासून तयार होणार कोरोना लस
  • लस तयार करण्यासाठी लाखो किड्यांचा वापर
     

कोरोना लस बनवण्यासाठी आता किड्यांचाही बळी जाणाराय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, हे खरं आहे. किड्यांपासून कशी लस बनवली जातेय? आणि ही लस कधी येणार? वाचा सविस्तर

कोरोनावर लस बनवण्यासाठी प्रत्येक देशात प्रयत्न सुरूयत. आता किड्यांपासून लस बनवण्याची प्रक्रिया सुरू झालीय. रेशीम किड्यांचा वापर लस विकसित करण्यासाठी प्रभावीत असल्याचा दावा जपानच्या क्युशू विद्यापीठाने केलाय. विद्यापीठाचे प्राध्यापक ताकाहीरो कुसाकाबे आणि त्यांची टीम रेशीम किड्यांपासून लस तयार करतेय. या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात रेशीम किड्यांचा वापर करण्यात आलाय.कोरोनाची लस बनवण्यासाठी रेशीम किड्यांचा वापर का महत्त्वाचा आहे पाहुयात -

 

  • कोरोना लस बनवण्यासाठी रेशीम किड्यांचा वापर करणार
  • प्रत्येक अळी ही एक फॅक्टरी आहे जी विशिष्ट प्रकारची प्रोटीन तयार करते
  • हे प्रोटीन लसनिर्मितीचा मुख्य घटक आहे
  • तोंडावाटे घ्यायची लस तयार करणे शक्य आहे
  • रेशीम किड्यांपासून तयार केलेली लस 2021 पर्यंत मानवी चाचणी सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे...पश्चिम जपानमधील फुकुओका येथील क्युशू विद्यापीठाच्या इमारतीत 500 वेगवेगळ्या फिलोजेनीमध्ये सुमारे 2 लाख 50 हजार रेशीम किडे आहेत...कुसाकाबेंच्या प्रयोगशाळेत विद्यापीठाकडून विशेष परवानगी असलेले विद्यार्थी किड्यांपासून लस विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतायत...प्रभावी लसनिर्मितीसाठी संशोधन योजना तयार केलीय...पण, ही लस कोरोनावर प्रभावी ठरो हीच अपेक्षा...


संबंधित बातम्या

Saam TV Live