एकवेळ कोरोना बरा होईल, पण 'या' वायरसचं काय करायचं?

सिद्धेश सावंत
शनिवार, 7 मार्च 2020

अशातच सोशल मीडियात सध्या चर्चा रंगली आहे, ती भोजपुरी गाण्यांची. सोशल मीडियामध्ये कोरोना वायरसपेक्षा कोरोना वायरसवर काढण्यात आलेली गाणी सध्या तुफान चर्चिली जात आहेत.

सध्या संपूर्ण जगात एक वायरसने खळबळ उडाली आहे. नाव आहे कोरोना. चीनमध्ये आतापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त जणांना या वायरसने आपल्या कवेत घेतलंय. तर इराक, अमेरिका आणि नेदरलॅन्डमध्येही आता हा वायरस फोफोवू लागला आहे. अशातच भारतातही कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं एकच घबराट उडाली आहे. जो तो सध्या मास्क घेण्यासाठी मेडिकलचा धावा करतोय. 

 

हेही वाचा - #Ayodhya | राम मंदिरासाठी शिवसेना फाडणार 1 कोटींची पावती

हेही वाचा - कोरोनापासून बचावासाठी कुणी बनवला 'बॅटमॅन' सूट?

 

अशातच सोशल मीडियात सध्या चर्चा रंगली आहे, ती भोजपुरी गाण्यांची. सोशल मीडियामध्ये कोरोना वायरसपेक्षा कोरोना वायरसवर काढण्यात आलेली गाणी सध्या तुफान चर्चिली जात आहेत. विशेष म्हणजे ही गाणी भोजपुरी असल्यानं त्यांची चर्चा आणखीनच रंगली आहे. एक वेळ कोरोना बरा होईल, पण या वायरसवर गाणं करुन वायरल झालेल्यांच्या वायरसचं काय करायचं, अशी खिल्ली उडवली जातेय. 

 

हेही वाचा - बायकोसाठी कायपण! स्वत:ची मॅच सोडून निघाला तिच्या फायनलला

हेही वाचा - अरे देवा! ऐन लग्नसराईत सोनं प्रतितोळा 50 हजार होणार?

 

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच खरंतर ही गाणी तयार करण्यात आली आहे. फेसबूक ट्विटरवर आता मात्र याची चर्चा तुफान सुरु आहे. 'लहंगा मे वायरस कोरोना घुसल बा', हे गाणं तर सध्या खूप गाजतंय. महिन्याभरापूर्वी चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना वायरसवर मीम्स शेअर करणाऱ्यांनी आता-आता जर धास्ती वाटू लागली आहे. आता मात्र हा वायरस फक्त भोजपुरीच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेनेही या वायरलची भारीच धास्ती घेतली. पण त्या सगळ्यात हे गाणं मात्र हीट होतंय. 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

'लहंगा मे वायरस कोरोना घुसल बा' या गाण्यापेक्षा यू ट्यूबवर कोरोनावर काढलेलं त्याहीपेक्षा जास्त गाजलेलं गाणं दुसरंच आहे. या गाण्याचं नाव आहे हॅलो कौन कोरोना वायरस. अवघ्या महिन्याभरात 2 लाखाहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलंय. कोरोनावर औषध येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत या गाण्यांनीच चालवून घ्यावं लागणार आहे. गाण्यांमुळे जीव वाचणार नाही. पण किमान जीव असेपर्यंत आनंद लुटता येईल, हे नक्की. 

 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

corona virus viral song meme funny bhojpuri songs china iran india maharashtra trending care health 


संबंधित बातम्या

Saam TV Live