पान, मावा, तंबाखू खाणा-यांनो, तर तुम्हाला 1 हजाराची पावती फाडावी लागेल!

प्रमिल क्षेत्रे
बुधवार, 18 मार्च 2020

एखादा कोपरा, कचरा पेटीच्या आजूबाजूची जागा, गटाराचं दार, याव्यतिरीक्त अगदी कोणतीही जागा असो, अनेकांना कुठेही थुंकायची घाणेरडी सवय असते. मात्र अशी सवय असणा-यांचा आता चांगलाच खिसा कापला जाऊ शकतो.

मुंबई - पान, मावा, तंबाखू खाणा-यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पान, मावा, तंबाखू खाणारे जागोजागी थुंकून भिंती रंगवण्याचं काम करतात. तशा भींती मुंबईसाठी काही नव्या नाहीत. एखादा कोपरा, कचरा पेटीच्या आजूबाजूची जागा, गटाराचं दार, याव्यतिरीक्त अगदी कोणतीही जागा असो, अनेकांना कुठेही थुंकायची घाणेरडी सवय असते. मात्र अशी सवय असणा-यांचा आता चांगलाच खिसा कापला जाऊ शकतो.

 

मुंबई महानगर पालिकेने रस्त्यावर थुंकणा-यांच्या दंडात तब्बल 5 पटींनी वाढ केली आहे. 200 रुपयांच्याऐवजी आता 1 हजार रुपयांचा दंड रस्त्यावर  थुंकल्यास आकारला जाणार आहे. त्यामुळे थुंकताना जरा विचार करा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. 

 

कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, म्हणून खबरदारीखातर हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई रुग्णाचा पहिला बळी मंगळवारी गेला. त्यानंतर लोकांनी धास्ती घेतली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते आहे.

 

गर्दी टाळण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर मुंबईतील गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे पुण्यातील नेहमीच गजबजलेले रस्तेही एकदम शांत झाले असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील प्रवाशी तोंडाला मास्क लावून खबरादारी बाळगत आहेत. तसंत नेहमीच गर्दीच्या वेळी खचाखच भरलेली असणारी मुंबई लोकल आज मात्र एकदम रिकामी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

 

कोरोनाच्या धास्तीवर लोकांनी धास्ती घेतल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासनच्या आवाहनला साद देत, अनेक मुंबईकरांनीही घरीच राहणं पसंत केलंय. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यात आधी गर्दी कमी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी वर्क फ्रॉम होम सारखे पर्याय समोर आलेत. अशातच लोकांनीही घराबाहेर न पडता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलल्याचं चित्र आज मुंबईच्या लोकलमध्ये पाहायला मिळतंय. तर तिकडे पुण्यातील रस्तेही निर्जन झालेत. 

 

हेही वाचा - आता या राज्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण

हेही वाचा - हजामत बंद! पुण्यात कोरोनामुळे आता सलूनही बंद राहणार

 

पाहा व्हिडीओ - 

mumbai spit on road fine hike by five times corona virus bmc mumbai people shivsena corona virus


संबंधित बातम्या

Saam TV Live