CORONA GO रे म्हाराजा, देवगडात कोरोना रोखण्यासाठी घातलं गा-हाणं

अनंत पाताडे
सोमवार, 16 मार्च 2020

सध्या कोरोनाचा धुमाकूळ राज्यात पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जमावबंदी करण्यात आली आहे. 144 कलम कोकणातल्या या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलं आहे. 

सिंधुदुर्ग- तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड नावाचा एक तालुका आहे. देवगड हा तालुका तसा हापूस आंब्यासाठी ओळखला जातो. पण संपूर्ण तळकोकणच ओळखला जातो तो तिथल्या खास गा-हाण्यांसाठी. सध्या कोरोनाचा धुमाकूळ राज्यात पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जमावबंदी करण्यात आली आहे. 144 कलम कोकणातल्या या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलं आहे. 

 

पण बातमी कलम लागू केल्याची नाहीच. बातमी आहे कोरोनाला रोखण्यासाठी देवगडमधल्या ग्रामस्थांनी घातलेल्या गा-हाण्याची. देवगडच्या वाडातर गावातल्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी गा-हाणं घातलंय. हे गा-हाणं सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतंय. कसं आहे हे गा-हाचं तुम्हीच पाहा - 

 

VIDEO - 

 

मुंबईनंतर आता कोकणातील महत्त्वाच्या मानल्या जाणा-या दोन जिल्ह्यांमध्ये जमावबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोकणातील  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. 

 

konkan deogad sindhudurg corona virus corona virus konkan special prayer to prevent marathi

 


संबंधित बातम्या

Saam TV Live