सुट्टीच्या अफवेचा आधी दिलासा... आणि मग निराशा!

प्रमिल क्षेत्र
बुधवार, 18 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय ठाकरे सरकार राज्यातील सरकारी कर्मचा-यांबद्दल घेईल, अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना वाटत होती. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याच्याबाबत ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वर्क फ्रॉम होमच्या सूचना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यात. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्याच धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांनीमध्ये संभ्रम होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय ठाकरे सरकार राज्यातील सरकारी कर्मचा-यांबद्दल घेईल, अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना वाटत होती. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याच्याबाबत ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

 

कोरोनाच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल (17 मार्च) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचा-यांना सुट्टी देण्याची घोषणा झाल्याची अफवा पसरवण्यात आली. 7 दिवस सरकारी कर्मचा-यांना सुट्टी देण्यात आल्याची अफवा वा-यासारखी पसरली. या घोषणेमुळे सरकारी कर्मचा-यांमध्ये अचानक उत्साह दाटून आला होता. काही वेळासाठी का होईना, पण सरकारी कर्मचा-यांना धडाधड 7 दिवसांच्या सुट्टीचा पटकन प्लॅनही तयार केला होता. सरकारी कर्मचा-यांची आपआपसात कुजबूज सुरु झाली होती. ही बातमी खरी आहे की खोटी आहे, या बद्दल सरकारी कर्मचा-यांचा विश्वास बसत नव्हता.

 

काही दिवसांपूर्वीच 5 दिवसांचा आठवडा झाल्याचा आनंद सरकारी कर्मचा-यांना अजून नीट साजरा करता आलेला नव्हता. अशात संपूर्ण आठवडा सुट्टी मिळणार, या कल्पनेने प्रत्येक सरकारी कर्मचारी आश्चर्यचकीत झाला नसता तरच नवल. मात्र हे आश्चर्य निराशेत बदलायला फार वेळ लागला नाही.

 

कॅबिनेटची बैठक संपली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया टीव्हीवर आली. सरकारी कर्मचाऱ्यायंनी सुट्टी देण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि ज्या वेगवान सरकारी कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा प्लान केला होता, त्याहीपेक्षा वेगान त्या प्लॅवर पाणी फेरलं गेलं. हाती निराशा आली. आणि सरकारी कर्मचा-यांना दिलासा देणा-या अफवेने मुख्यमंत्र्यांच्या अफवेने सपशेल निराशा केली. कमीतकमी संख्येने आता सरकारी कामकाज चालवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. थोडक्यात काय तर सरकारी कर्मचा-यांना स्वतःहून आपली काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनामुळे सरकारी सुट्टी मिळेल, अशी अपेक्षा करत बसण्यात काही अर्थ नाही, याची जाणीव आता सरकारी कर्मचा-यांना झाली असावी. 

 

 

हेही वाचा - अरे देवा, कोरोनाचा आणखी एक रुग्ण महाराष्ट्रात आढळला

हेही वाचा - वाचा कोरोनाशी संबंधित 10 महत्त्वाच्या घडामोडी

हेही वाचा - कोरोनाचा धोका ऑगस्टपर्यंत राहणार?

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

corona virus leave for govt employee fake news marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live