कोरोना व्हायरस मानवनिर्मितच, चीनच्या संशोधकाच्या दाव्यानं खळबळ

साम टीव्ही
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

 

  • कोरोनावरचा सर्वात मोठा खुलासा
  • कोरोना व्हायरस मानवनिर्मितच..
  • चीनच्या संशोधकाच्या दाव्यानं खळबळ

कोरोनावर आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झालाय. हा खुलासा खुद्द चीनच्या महिला संशोधकानं केल्यानं खळबळ माजलीयएकीकडे कोरोना लस कधी येणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय.

दुसरीकडे कोरोनासंबंधी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झालाय. कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचा दावा करण्यात आलाय. खुद्द चीनच्याच एका महिला व्हायरोलॉजिस्टनं हा खुलासा केल्यानं खळबळ माजलीय. व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग असं त्यांचे नाव आहे. यासंबंधी पुरावे सादर करणार असल्याचंही ली-मेंग यांनी म्हटलंय.

काय म्हणाल्या ली-मेंग - 

कोरोना विषाणुचा संसर्ग वुहानच्या मांस बाजारातून आलेला नाही, कारण मांस बाजार ही स्मोक स्क्रीन आहे, तर व्हायरस निसर्गाची निर्मिती नाही. हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला आहे आणि तो मानवनिर्मित आहे. या विषाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंट सारखा आहे आणि त्याच्या आधारे हे सिद्ध होते की हा मानवनिर्मित विषाणू आहे. 

चिनी सरकारच्या धमकीनंतर ली मेंग वास्तव्यास अमेरिकत आल्यात. याचदरम्यान त्यांनी कोरोना विषाणू हा मानवनिर्मित असल्याचं सांगत चीनवर निशाणा साधलाय़. कोरोना मानवनिर्मित नाही किंवा चीनमधून तो जगभरात पसरला नाही, असा कांगावा चीन वारंवार करतोय. पण आता खुद्द एका चिनी महिला संशोधकाच्या खुलाश्यामुळे चीन तोंडावर आपटलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live