CORONA UPDATE | मुंबई 31 मार्चपर्यंत जमावबंदी लागू

MUMBAI CURFEW 960 X 540
MUMBAI CURFEW 960 X 540

मुंबई - मुंबई शहरात वाढणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी, आता मुंबई पोलिस सरसावले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी, मुंबई पोलिसांनी थेट 144 कलम लागू करत, जमावबंदी जाहीर केली आहे. 31 मार्चपर्यंत मुंबईत ही जमावबंदी लागू असणार असून, खासगी मुंबई टूअरलाही पोलिसांनी मनाई केली आहे. 

144 कलम लागू झाल्यामुळे एका ठिकाणी पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोकांना जमण्यास परवानगी नसणार आहे. जमावबंदीचा हा आदेश फक्त कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी बजावण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तसंच हा कायदा मोडणाऱ्यांवर CRPC कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय आहे जमावबंदीचं 144 कलम?

कलम 144 हे फौजदारी दंडसंहिता 1973 (sec.144 Cr.P.C. 1973) मधील असून ते अशा ठिकाणी लागू केले जाते जिथे सुरक्षेसंबंधात भीती असेल किंवा दंगलीची संभावना असेल.तसेच यामध्ये 5 किंवा जास्त लोकांनी जमाव करण्याला आडकाठी आणते. यालाच जमावबंदी किंवा कर्फ्यू असं सुद्धा म्हणलं जातं. जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी (collector) / जिल्हा दंडाधिकारी (district magistrate) / SDM (sub divisional magistrate) / इतर कार्यकारी दंडाधिकारी (any other executive magistrates) देऊ शकतात आणि लागू करू शकतात.

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान हा आकडा आणखी वाढण्याची भीती मिळतेय. मुंबईतील लोकसंख्या पाहता, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता जमावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गर्दी रोखण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांना वाटतोय. आतापर्यंत मुंबईत 5 रुग्ण आढळेत. ठाणे, पनवेल, नवी मुंबईत, कल्याणमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय. कोरोनाचा संसर्ग शीर्घ गतीने होत असल्यानं आता सर्वच स्तरातून खबरदारी घेण्यात येतेय. 

पाहा व्हिडीओ - 

corona virus mumbai 144 curfew till march end police marathi HEALTH MAHARASHTRA

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com