corona mum shut down
corona mum shut down

मुंबई शट डाऊन होण्याच्या मार्गावर! लोकल, बस मेट्रो बंद होणार?

मुंबई  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल बंद होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर बससेवा आणि मेट्रोसेवाही बंद होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर विचार होणारंय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. लोकलमधली गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करू, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्य बैठकीत यावर महत्त्वपूर्ण निर्ण घेतला जाण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबता निर्णय घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. मुंबईतील गर्दी रोखण्यासाठी उपयायोजना करण्याचं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. 

मुंबईची लोकल म्हणजे या शहराच्या रक्तवाहिन्याच. मात्र, जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचं आगमन महानगरी मुंबईतही झाल्यानं सगळेच सतर्क झालेत...प्रचंड वेगानं पसरणाऱ्या कोरोनासाठी मुंबई लोकलनं प्रवास करणारे प्रवासी तर आयतं सावज आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनानं गर्दी टाळण्याचा सल्ला दिलाय..मात्र, रोजीरोटीसाठी प्रवास करणं मुंबईकरांसाठी गरजेचं आहे..मात्र, एखाद्या लोकल प्रवाशाला कोरोनाची लागण झालेली असली तरी त्याची लागण क्षणार्धात हजारो प्रवाशांना होऊ शकते.

मुंबई लोकलनं दररोज सरासरी 71 लाख प्रवासी प्रवास करतात..एका लोकलमध्ये जवळपास 3 ते 4 हजार प्रवासी असतात..एका डब्यात किमान 150 ते 200 प्रवासी प्रवास करतात. केवळ मुंबईच नाही तर महत्त्वाच्या स्थानकांवरही रेल्वेकडून काळजी घेतली जातेय..त्याचवेळी प्रवाशांनीही स्वतः जागरूक राहून काळजी घेण्याचं अपील केलं जातंय. ही आकडेवारी पाहिली तर मुंबईची लोकल ही एखादी सुप्त कोरोना बॉम्ब आहे की काय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

पाहा व्हिडीओ - 

MUMBAI LOCAL BUS GOVERMNET TRAIN CENTRAL RAILWAY WESTERN RALWAY METRO BUS BEST CORONA VIRUS INDIA SHIVSENA AGHADI MAHAGHADI NCP CONGRESS PEOPLE HEALTH PATIENT

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com