औरंगाबादेत महिलेला कोरोनाची लागण, राज्यातील रुग्णांची संख्या 32वर

माधव सावरगावे
रविवार, 15 मार्च 2020

महाराष्ट्रातील रुग्णाची संख्या 32 वर पोहोचली आहे. या महिलेने रशिया आणि कझाकिस्तानमधून प्रवास केल्यानं तिला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय.

औरंगाबाद  -  महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. औरंबादेत 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णाची संख्या 32 वर पोहोचली आहे. या महिलेने रशिया आणि कझाकिस्तानमधून प्रवास केल्यानं तिला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या महिलेला पकडून आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 32 वर पोहोचल्यानं चिंता वाढली आहे. 

 

 

 

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?

 • मुंबई - 5 रुग्ण
 • पुणे - 10 रुग्ण
 • ठाणे - 1 रुग्ण
 • नवी मुंबई - 1 रुग्ण
 • पनवेल - 1 रुग्ण
 • यवतमाळ - 2 रुग्ण
 • नागपूर - 4 रुग्ण
 • अहमदनगर - 1 रुग्ण
 • पिंपरी चिंचवड - 5 रुग्ण
 • कल्याण - 1 रुग्ण 
 • औरंगाबाद - 1 रुग्ण

 

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता देशातील निम्म्याहून अधिक राज्यांनी 31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात शाळा, कॉलेजेससोबत मॉल्सही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे.

 

दुसरीकडे करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने , कोरोना व्हायरसची आपत्ती घोषित केली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. केंद्र सरकारने करोना व्हायरस ही आपत्ती घोषित केली.. तसंच करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबीयांना 4 लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.

 

हेही वाचा - कोरोनावर 30 दिवसांत मात केली नाही तर येणार मोठं संकट?

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा पहिली बळी बुलडाण्यात

हेही वाचा - कोरोनाने गिळल्या 600 कोंबड्या

 

पाहा व्हिडीओ - CORONA | कोरोना व्हयरसचे हे गंभीर साईड इफेक्ट्स

 

corona virus one more positive patient in maharashtra marathi aurangabad india health india 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live