वटवाघुळांमुळे पसरला कोरोना व्हायरस? अमेरिकेने केलेले आरोप खरे ठरले?

साम टीव्ही
सोमवार, 25 मे 2020

 

  • चीनच्या वुहानमध्ये कोरोना पॉझिटिव्ह वटवाघूळ
  • वटवाघुळांमुळे पसरला कोरोना व्हायरस?
  • अमेरिकेने केलेले आरोप खरे ठरले?

वटवाघुळांपासून कोरोना व्हायरस पसरला अशी चर्चा अगदी सुरुवातीपासूनच होती... अशातच आता चीनच्या वुहानमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह वटवाघूळ आढळले आहेत. ज्यामुळे एक नवी चर्चा सुरु झालेय. हे प्रकरण नेमकं काय आहे? वाचा...

वुहानमधल्या वटवाघळांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. आणि त्यानंतर हा व्हायरस माणसांमध्ये पसरला. असा दावा अमेरिकेने केला. आणि चीनच्या वुहानकडे संशयाची सुई वळली. 

पण वुहान मधल्या व्हारोलॉजी इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी हे आरोप फेटाळले. पण आता याच डॉक्टरांनी लॅबमध्ये तीन वटवाघुळांनी कोरोनाचा संसर्ग असल्याचं मान्य केलं. पण हे मान्य करत असतानाच, अमेरिकेला खोटं सिद्ध करायलाही ते विसरले नाहीत. वटवाघळांमधला व्हायरस आणि माणसांमधला व्हायरस यात फरक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

2004 पासूनच वुहानमधल्या लॅबमध्ये कोरोनावर रिसर्च सुरु असल्याचं चीननं म्हटलंय. पण संशयाची सुई चीनकडे असतानाच तीन वटवाघुळ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने शंका वाढलेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live