VIDEO | सूर्यप्रकाशात करोना विषाणू होतात नष्ट, काय आहे आतापर्यंतचं सर्वात मोठं निरीक्षण??

साम टीव्ही
शनिवार, 25 एप्रिल 2020

एकीकडे कोरोना व्हायरस जगाची डोकेदुखी बनलाय तर दुसरीकडे एक दिलासादायक बातमी देखील पुढे येतीय. सूर्यप्रकाशात कोरोना व्हायरस फार काळ टिकत नसल्याचा दावा केला जातोय.

एकीकडे कोरोना व्हायरस जगाची डोकेदुखी बनलाय तर दुसरीकडे एक दिलासादायक बातमी देखील पुढे येतीय. सूर्यप्रकाशात कोरोना व्हायरस फार काळ टिकत नसल्याचा दावा केला जातोय.

कोरोना व्हायरसनं साऱ्या जगाची डोकेदुखी वाढवलीय. या आजारावर अद्याप लस सापडलेली नाही. अशातच एक दिलासादायक बातमी पुढे आलीय. करोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलाय. मात्र हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 
सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावलाय. यामुळे उन्हाळ्यात करोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झालीय.आतापर्यंतचा सर्वात मोठं निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचं लक्षात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिलीय.  तापमान आणि आर्द्रता वाढवणं करोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे. 
 तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला शास्त्रज्ञांनी  पाहणी केली तेव्हा तोच परिणाम होत असल्याचं लक्षात आलं. मात्र अद्याप हा रिसर्च सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समीक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील. अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आलाय. आता नव्या दाव्यानुसार व्हायरस वेगवेगळ्या तापमानात, हवामानात आणि पृष्ठभागावर कसा रिऍक्ट होतो याबद्दल माहिती देण्यात आलीय. नव्या संशोधनानुसार, व्हायरस थंड आणि कोरड्या वातावरणात जास्त काळ टिकतो. तर दुसरीकडे उबदार आणि आर्द्रता असलेल्या वातावरणात कमी टिकतो. त्यामुळे हा दावा खरा ठरला. तर काही अंशी का होईना कोरनाविरोधातल्या लढाईला थोडंफार यश येईल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live